|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्या

संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्या 

प्रतिनिधी/ सोलापूर

संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत. तसेच मिलिंद एकबोटे यांच्यासह इतरांची त्वरित सुटका करावी आदी मागण्यासाठी शिव प्रतिष्ठानसह विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी विजयी मोर्चा काढण्यात आला.

चार हुतात्मा पुतळा चौक येथील या मोर्चास सकाळी प्रारंभ झाला. भगवे फेटे व भगवे उपरणे घालून पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. डॉ. आंबेडकर चौक, श्री सिद्धेश्वर प्रशाला मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी शिवसेनेचे प्रताप चव्हाण, दत्तात्रय पिसे, विश्वहिंदू परिषदेचे रवींद्र साळे, माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्यासह पदाधिकाऱयांची यावेळी भाषणे झाली.

दरम्यान शिष्टमंडळाद्वारे जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. भिडे गुरुजी वढू (बु) येथे 1 जानेवारी रोजी येथे येणार असून, त्यांची सभा होणार असल्याची अफवा सोशल मिडीयावरुन सर्व प्रथम पसरवणाऱया विकी सौंडे यांची चौकशी व्हावी. तेथे सापडलेल्या आधारकार्डचा तपास व्हावा. खोटी फिर्याद दाखल करणाऱयांची चौकशी व्हावी. †िभडे गुरुजींवरील गुन्हे मागे घ्यावेत. मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई, विरेंद्र तावडे यांची सुटका करण्यात यावी. यासह अन्य मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

या आंदोलनात शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, विठ्ठल साठे, महेश धाराशिवकर, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विजय पुकाळे, भाजपाचे चन्नवीर चिट्टे, माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, चंद्रिका चव्हाण, शुभांगी बुवा, लहु गायकवाड, पुरुषोत्तम कारकल, हिंदू महासभेचे अभयसिंह इंचगावकर, शशिकांत चव्हाण यांच्यासह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related posts: