|Monday, August 26, 2019
You are here: Home » उद्योग » शनिवारपर्यंत साखरेच्या निर्यातीला मंजुरी

शनिवारपर्यंत साखरेच्या निर्यातीला मंजुरी 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

देशातील साखरेच्या उत्पादनात वाढ झाल्याने सरकारने निर्यातीला परवानगी दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे शनिवारपर्यंत 20 लाख टन साखरेची निर्यात करता येणार आाहे. कारखान्यांकडील अधिक असणारा साठा कमी व्हावा आणि ऊस उत्पादक शेतकऱयांना देयक देण्यास पैसे मिळावेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला. याव्यतिरिक्त सरकारने आयात शुल्क मुक्त अधिकारांतर्गत सप्टेंबर 2018 पर्यंत पांढऱया साखरेची निर्यात करण्यास मंजुरी दिली. या योजनेनुसार व्यापाऱयांना शून्य आयातशुल्काने दोन वर्षांपर्यंत साखरेची आयात करता येते.

21 मार्चच्या आकडेवारीनुसार साखर कारखान्यांना 13,899 कोटी रुपये शेतकऱयांना देणे बाकी होते. कारखान्यांकडे असणारा अधिक साठा यामुळे निर्यात करता येणार आहे अथवा आपल्याकडील साठा दुसऱया कारखान्यांना देता येईल. सरकारी आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात 5136 कोटी, कर्नाटक 2536 कोटी आणि महाराष्ट्रात 2348 कोटी रुपयांचे देणे बाकी आहे. चालू बाजार वर्षात 27.2 दशलक्ष टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.