|Saturday, August 24, 2019
You are here: Home » leadingnews » अदिती शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजक नाहीत : सुनील तटकरे

अदिती शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजक नाहीत : सुनील तटकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

रायगडावर होणाऱया शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या अयोजनाशी आपला वैयक्तिक संबंध नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमांत्रित करण्यात आल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.

”शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 123 वर्षांपासून केलं जातं. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, भाजपचे ज्येष्ठ  नेते लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, शरद पवार अशा अनेक मान्यवरांनी आजपर्यंत या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे,’’ असंही सुनील तटकरेंनी म्हटले आहे.