|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » येलूर दुर्घटना : कनिष्ठ अभियंत्यासह दोघे निलंबित

येलूर दुर्घटना : कनिष्ठ अभियंत्यासह दोघे निलंबित 

प्रतिनिधी/ सांगली

वाळवा तालुक्यातील येलूर येथे विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी महावितरणने केलेल्या चौकशीमध्ये स्थानिक अधिकाऱयांकडून हलगर्जीपणा झाल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले. या प्रकरणी महावितरणच्या येलूर शाखेचे कनिष्ठ अभियंता नितीन मुटेकर व वरिष्ठ तंत्रज्ञ रघुनाथ बावचकर यांनी शनिवारी निलंबित करण्यात आले. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 20 हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, येलूर येथील उसाच्या शेतात वीजतारेचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने प्रभाकर लक्ष्मण महाडिक, छाया लक्ष्मण महाडिक, प्रकाश मगदूम यांचा 31 मार्च रोजी पहाटे मृत्यू झाला. या प्रकरणी 24 तासांच्या आत प्राथमिक चौकशी करुन संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी प्रथमदर्शी दोषी आढळून आल्यास त्याच्याविरुध्द कर्मचारी सेवानियम अन्वये कठोर कारवाई अथवा निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून जिल्हा महावितरण कार्यालयाला देण्यात आले हेते. त्यानुसार सांगली महावितरण कार्यालयाचे प्रभारी अधीक्षक अभियंत्यांनी चौकशी केली असता प्राथमिक चौकशीत प्रथमदर्शी दोषी आढळून आलेले येलूर शाखेचे कनिष्ठ अभियंता नितीन मुटेकर व वरीष्ठ तंत्रज्ञ रघुनाथ बावचकर यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेची पुढील चौकशीही सुरु करण्यात आली असून आणखी कर्मचारी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आली.

Related posts: