|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुर्टी-फोंडा येथे कार अपघातात युवक ठार

कुर्टी-फोंडा येथे कार अपघातात युवक ठार 

प्रतिनिधी/ फोंडा

कुर्टी बगलरस्त्यावर कार अपघातात जखमी झालेल्या प्रदीप सगुण गावकर (28, रा. खांडेपार) या युवकाचा काल सोमवारी पहाटे बांबोळी येथील गोमेकॉत मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी 5.45 वा. सुमारास भरधाव वेगात असलेल्या कारगाडीने रस्त्याच्या दुभाजकाला धडक दिल्याने हा अपघात झाला होता. या अपघात अन्य दोन युवक जखमी झाले आहेत.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप गावकर, साईश महेंद्र कोटारकर (23) व राहूल सतरकर (22) हे खांडेपार येथील तिघे युवक जीए 08 ए 1489 या क्रमांकाच्या झेन कारगाडीने खांडेपारहून-फर्मागुडीकडे निघाले होते. साईश कोटकर हा गाडी चालवित होता तर प्रदीप चालकाच्या बाजूला बसला होता. कुर्टी बगलरस्त्यावरील हाऊसिंग कॉलनीजवळ भरधाव वेगात असलेल्या या कारची बाजूच्या दुभाजकाला जोरदार धडक बसली. या धडकेनंतर कारगाडी रस्त्यावर उलटली. प्रदीप याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने अत्यवस्थ स्थितीत त्याला बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना सोमवारी पहाटे त्याचे निधन झाले. साईशचा पाय फॅक्चर झाला असून राहूल हा किरकोळ जखमी झाला आहे. निष्काळजीपणे वाहन हाकून एकाच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक साईश कोटारकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मयत प्रदीप याच्यापश्चात आई, वडिल, एक विवाहित व एक अविवाहित अशा दोन बहिणी आहेत. प्रदीप हा मडगाव येथे एका एटीएम सेवा देणाऱया कंपनीमध्ये कामाला होता.

 

Related posts: