|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » शिवसेना गांडुळाची अवलाद – अजित पवार

शिवसेना गांडुळाची अवलाद – अजित पवार 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे, त्यांचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही. अशा शब्दात विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे.

कोल्हापुरमधील नेसरी येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी शिवसेनेसहित भाजपावर टीका केली. ‘भाजपसोबत सत्तेत बसायचे, कॅबिनेटच्या बैठकीत सर्व प्रश्नांना मान्यता द्यायची आणि एखादा प्रश्न निर्माण झाला की विरोध करायचा, ‘अरे शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे, त्याचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही’, असे अजित पवारांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन पुकारले असून नेसरी येथील जाहीर सभेने दुसऱया दिवसाची सुरूवात केली. सभेत बोलताना अजित पवार यांनी भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवर जोरदार टिका केली. अजित पवारांनी शिवसेनेसोबत भाजपाचाही चांगलेच धारेवर धरले.

 

Related posts: