|Thursday, September 19, 2019
You are here: Home » क्रिडा » पाकच्या शदाब खानला दंड

पाकच्या शदाब खानला दंड 

वृत्तसंस्था/ कराची

विंडीज विरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सोमवारी झालेल्या दुसऱया सामन्यात खेळताना पाकचा फिरकी गोलंदाज शदाब खानने आयसीसीच्या शिस्तपालन नियमाचा भंग केल्याने त्याला दंड करण्यात आला आहे. 19 वर्षीय शदाब खानला मिळणाऱया मानधनातील 20 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.

या दुसऱया सामन्यात विंडीजचा सलामीचा फलंदाज वॉल्टनला शदाब खानने त्रिफळाचीत केले या क्षणानंतर शदाब खानने वॉल्टनला पॅव्हेलियनमध्ये जाण्याची खूण हाताने केली. शदाब खानकडून शिस्तपालन नियमाचा भंग झाल्याचे आयसीसीने सांगितले. ही घटना विंडीजच्या डावातील नवव्या षटकांत घडली. वॉल्टन बाद झाल्यानंतर शदाब खानने त्यावर अयोग्य अशी टिपणी केल्याचे आढळून आले. शदाब खानने पाककडून एक कसोटी, 17 वनडे आणि 15 टी-20 सामने खेळले आहेत.