|Friday, October 18, 2019
You are here: Home » leadingnews » यंदा समाधानकारक पाऊस पडणार ; स्कायमेटचा अंदाज

यंदा समाधानकारक पाऊस पडणार ; स्कायमेटचा अंदाज 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

देशात यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा सहन करणाऱया नागरिकांसह बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

सध्याची परिस्थिती, समुद्राचे तापमान, वाऱयाची गती यावरुन हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा सरासरीच्या 100ज्ञ् पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊसमान सामान्य राहील. इतकंच नाही तर मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल.