|Sunday, December 8, 2019
You are here: Home » Top News » हिंजवडीत, कोरेगाव पार्क परीसरात पकडले सर्वाधिक ड्रंकर्स

हिंजवडीत, कोरेगाव पार्क परीसरात पकडले सर्वाधिक ड्रंकर्स 

ऑनलाईन टीम / पुणे :

पोलिसांकडून वेळोवेळी दारू पिऊन गाडी चालवू नका असे आवाहन करण्यात येते. नशेमध्ये गाडी चालविल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आपल्या प्राणांहून अधिक दारू प्रिय आहे की काय असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कारण जानेवारी ते मार्च 2018 या केवळ तीन महिन्यात कोरेगावपार्क येथे तब्बल 360 तर हिंजवडी येथे 339 दारू पिनाऱयांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

हिंजवडी व कोरेगावपार्क हा पुण्यातील हायप्रोफाईल भाग म्हणून ओळखला जातो. कोरेगावपार्कमध्ये अनेक बार व मोठमोठाली हॉटेल्स आहेत. तर हिंजवडीला आयटी पार्क म्हणून ओळखले जाते. याठिकाणी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. हजारो कर्मचारी याठिकाणी काम करतात. मात्र या दोन्ही ठिकाणीच्या उच्च शिक्षित नागरिकांकडूनच ड्रण्क अ‍Ÿण्ड ड्राईव्ह सारखे गंभीर गुन्हे केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महामार्गांवर होणाऱया अपघतांमध्ये दारू पिऊन गाडी चालविल्याचे अनेक प्रकरणे समोर येतात. दारू पिऊन गाडी चालविताना स्वतःबरोबरच इतरांचा जीव हे तळीराम धोक्मयात घालत असतात. वाहतूक पोलिसांकडून अश्या दारूपिणाऱयांवर अनेकदा कारवाई करण्यात येते. परंतु तरीही अनेकांवर याचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे वरील आकडेवारीतून समोर येत आहे. त्यातही कोरेगावपार्क व हिंजवडी या उच्च शिक्षित म्हणवल्या जाणाऱया नागरिकांच्या भागातच अधिक गुन्हे घडत असल्याने शिकलेली मानसे सुधारणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

 

Related posts: