|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहरात शंभरहून अधिक ठिकाणी क्हीव्हीपीएटीचे प्रात्यक्षिक

शहरात शंभरहून अधिक ठिकाणी क्हीव्हीपीएटीचे प्रात्यक्षिक 

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरातील सर्व सरकारी कार्यालयातील यंत्रणा विधानसभा निवडणूकीच्या कामात गुंतली आहे. निवडणूक कार्यालयात रात्री उशिरापर्यत अधिकाऱयांची वर्दळ सुरू आहे. मनपा कार्यालयातील अधिकारी व्हीव्हीपीएटी मशीनच्या जनजागृती कार्यक्रमात व्यस्त असल्याने मनपा कार्यालयात शांतता पसरली आहे.

विधान सभा निवडणूकीत यंदा प्रथमच व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर करण्यात येणार आहे. मतदान कुणाला झाले याची माहिती देणाऱया मशीनव्दारे मतदान करण्याची प्रक्रिया जनतेला नाही. यामुळे मशीनबाबत जनजागृती करण्याची मोहिम शहरात युध्दपातळीवर सुरू आहे. दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही मतदार संघात दिडशेहून अधिक ठिकाणी जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दि. 11 पासून या जनजागृती शिबीरास प्रारंभ झाला असून प्रत्येक सेक्टर अधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली चार ते पाच ठिकाणी जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे महापालिकेचे बहुतांश अधिकारी जनजागृती कार्यक्रमात गुंतले आहेत.

दक्षिण भागात एकूण 21 सेक्टर असून यापैकी 17 सेक्टरमध्ये जनजागृती उपक्रम राबविण्यात आला आहे. व्हीव्हीपीएटी मशीनवर मतदान कसे करायचे याबाबतचे प्रात्यक्षिक दक्षिण मतदार संघात 40 ठिकाणी दाखविण्यात आले. उत्तर विभागात 19 सेक्टरपैकी 16 सेक्टरमध्ये 70 ठिकाणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. सेक्टर ऑफिसर मास्टर टेनर आणि मुकादत अशा तीन कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून एका सेक्टरमध्ये चार ते पाच ठिकाणी प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. पण याला थंडा प्रतिसाद लाभत आहे. दि. 15 पर्यत जनजागृती मोहिम चालणार आहे.

निवडणूक विभागाच्यावतीने व्हीव्हीपीएटी मशीनबाबत जनजागृती करण्यात येत आहे. पण याला नागरिकांना अल्प प्रतिसाद लाभत आहे. यामुळे मतदानावेळी नागरिकांना या नव्या यंत्रोपकरणावर मतदान करताना वेळ लागण्याची शक्मयता आहे. मतदानाची वेळ सकाळी सात पासून सांयकाळी पाच वाजेपर्यत असणार आहे. पण नव्या यंत्रोपकरणावर मतदान करताना मतदारांना वेळ लागल्यास मतदान केंद्रावर रांगा लागण्याची शक्मयता आहे. यामुळे मतदान केंद्रात यंत्रांची संख्या वाढविण्याबरोबर वेळ वाढविण्याची गरज आहे.

Related posts: