|Sunday, August 18, 2019
You are here: Home » Top News » कठुआ बलात्कार ; वकीलाच्या जीवाला धोका

कठुआ बलात्कार ; वकीलाच्या जीवाला धोका 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीला न्याय देण्यासाठी लढणाऱया वकील दीपिका सिंह राजवंत यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.त्यांनी स्वतः याबाबत चिंत व्यक्त केली आहे.

‘माझ्या जीवाला धोका असून माझ्यावर बलात्कार केला जाऊ शकतो’, असे स्वतः दीपिका सिंह यांनी म्हटले आहे. ‘एका आठ वर्षांच्या पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी मी लढाई लढत आहे.मात्र, हा खटला घेतल्यापासून मला सर्वांनी वाळीत टाकले आहे. अप्रत्यक्ष बहिष्कारच घालण्यात आला आहे. त्यामुळे या लढाईत मी किती दिवस टिकेन माहित नाही’, अशी हतबलता दीपिका सिंह यांनी व्यक्त केली आहे.

दरम्या, ‘माझ्यासोबत काहीही होऊ शकते.माझ्यावर बलात्कार होऊ शकतो.माझी हत्या केली जाऊ शकते किंवा माझी कोर्टातील प्रॅक्सिटस थांबवली जाऊ शकते. सध्या मी अत्यंत भयंकर परिस्थितीतून जात आहे. मला व माझ्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी, अशी विनंती सुप्रीम कोर्टात केल्याचेही त्यांनी सांगितले.