|Friday, October 18, 2019
You are here: Home » leadingnews » यंदा पाऊसफुल्ल : हवामान विभाग

यंदा पाऊसफुल्ल : हवामान विभाग 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात यंदा समाधकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिल्लीतील पत्रकार परिषदेत वर्तवला आहे. तसेच यंदा सरासरी 97 टक्के पाऊस पडणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने वर्तविले आहे.

भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीने यंदाच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने पत्रकार परिषद घेऊन पाऊसमान कसे राहील, याबाबतची माहिती दिली. यंदा दुष्काळाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या वषी आयएमडीने 96 मिलीमीटर पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. त्या पार्श्वभूमीवर 95 टक्के पडला होता.