|Monday, February 17, 2020
You are here: Home » विविधा » वसंत व्याख्यानमालेत यंदा डॉ. काकोडकर, सुरेश प्रभू, राजू शेट्टी

वसंत व्याख्यानमालेत यंदा डॉ. काकोडकर, सुरेश प्रभू, राजू शेट्टी 

 पुणे / प्रतिनिधी :

वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित 144 वी वसंत व्याख्यानमाला येत्या 21 एप्रिल ते 20 मे या कालावधीत सायंकाळी साडेसहा वाजता टिळक स्मारक येथे पार पडणार आहे. याअंतर्गत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, माजी गृहमंत्री शिवराज पाटील, भाजपाच्या त्रिपुरा विजयाचे शिल्पकार सुनील देवधर, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, खासदार राजू शेट्टी, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या व्याख्यानांची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.

याबाबत बोलताना डॉ. टिळक म्हणाले, व्याख्यानमालेचे उद्घाटन 21 एप्रिलला सायंकाळी साडेसहा वाजता ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या व्याख्यानाने होणार आहे. 23 ला शिवराज पाटील यांचे, तर 24 ला ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांचे व्याख्यान होईल. 25 ला ‘बदलता पूर्वांचल’ या विषयावर भाजपच्या त्रिपुरा विजयाचे शिल्पकार सुनील देवधर यांचे आणि 26 ला ‘टेलिंग द स्टोरी ऑफ 833 मिलियन इंडियन्स’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचे व्याख्यान होणार आहे.

1 मे रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, तर 7 ला ‘धर्मनिरपेक्षता-राज्यघटना आणि वास्तव’ या विषयावर डॉ. माधव गोडबोले यांचे व्याख्यान होईल. 8 ला ‘धप्पा’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानिमित्त गिरीश कुलकर्णी हे बोलणार आहेत. 12 ला खासदार राजू शेट्टी यांचे तसेच 19 ला ‘माहिती तंत्रज्ञान- काल, आज आणि उद्या’ या विषयावर अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान होईल. 20 ला बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवींद्र साठे यांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप होईल.

पी. साईनाथ यांना न्या. . गो. रानडे स्मृती पुरस्कार

वक्तृत्वोत्तेजक सभा, ग्रंथोत्तेजक सभा, सेवासदन संस्था आणि पुणे प्रार्थना समाज या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांना ‘न्या. म. गो. रानडे स्मृती पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

Related posts: