|Friday, November 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » लालूप्रसादांच्या अनुपस्थितीत तेजप्रताप यांचा वाड्निःश्चय

लालूप्रसादांच्या अनुपस्थितीत तेजप्रताप यांचा वाड्निःश्चय 

पाटणा / वृत्तसंस्था

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादव यांचा वाड्निःश्चय बुधवारी पाटणा येथे पार पडला. ऐश्वर्या राय हिच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. या समारंभाला कुटंबीय तसेच अत्यंत जवळचे मित्र हजर होते. परंतु या विशेष क्षणी तेजप्रताप यांना वडिलांची उणीव भासली. ‘मिस यू पापा’ असा ट्विट देखील त्यांनी केला.

चारा घोटाळय़ाप्रकरणी शिक्षा भोगत असल्याने लालूंना या समारंभात सामील होता आले नाही. लालूंवर सध्या एम्समध्ये उपचार सुरू आहेत. लालूंची सून ऐश्वर्या ही बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगाप्रसाद राय यांची नात असून माजी मंत्री चंद्रिका प्रसाद राय यांची कन्या आहे.

सूत्रानुसार 12 मे रोजी बिहारच्या एका महाविद्यालयात तेजप्रताप यांचा विवाह पार पडू शकतो. या विवाहसोहळय़ाच्या निमित्ताने भाजपविरोधी पक्षांच्या एकजुटतेचे चित्र दिसून येऊ शकते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमवेत अनेक दिग्गज नेते या विवाहसोहळय़ात सामील होणार आहेत.

Related posts: