|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » बार्सिलोना-सेल्टा व्हिगो लढत बरोबरीत

बार्सिलोना-सेल्टा व्हिगो लढत बरोबरीत 

वृत्तसंस्था / माद्रिद

केवळ 10 खेळाडूंनिशी खेळणाऱया बार्सिलोनाला लायोनेल मेस्सीला बदली खेळाडूच्या माध्यमाने उतरवल्यानंतरही सेल्टा व्हिगाविरुद्ध 2-2 बरोबरीवर समाधान मानावे लागले. बार्सिलोनातर्फे ओस्मने डेम्बलेने 36 व्या व पॅसोने 64 व्या मिनिटाला तर सेल्टातर्फे जोनाथन कॅस्ट्रोने 45 व्या तर लॅगोने 82 व्या मिनिटाला गोल केले. मेस्सी तासाभरानंतर मैदानात आल्यानंतर जणू त्याच्या प्रेरणेनेच पॉलिन्होने बार्सिलोनाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली होती. पण, 82 व्या मिनिटाला लॅगो ऍस्पासने सेल्टासाठी महत्त्वपूर्ण गोल केला व त्यानंतर ही लढत बरोबरीत राहिली. बार्सिलोनाचे प्रशिक्षक अर्नेस्टो व्हॅल्वर्डे यांनी आपला संघ आणखी दोन विजयांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, असे याप्रसंगी म्हटले. बार्सिलोनाचे थोडेसे लक्ष शनिवारी सेव्हिलाविरुद्ध होणाऱया कोपा डेल रे फायनलवर देखील असून त्या पार्श्वभूमीवर, बार्सिलोनाने मेस्सी, लुईस सुआरेझ, गेरार्ड पिक्यू, सॅम्युएल, सर्जिओ बस्केट्स व इव्हान रॅकिटिक या दिग्गजांना प्रारंभी मैदानात उतरवणे टाळले होते. यापैकी मेस्सी नंतर 60 व्या मिनिटाला कॉटिन्होच्या जागी उतरला होता.

Related posts: