|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्याची राजकीय स्थिती स्थिर आहे

गोव्याची राजकीय स्थिती स्थिर आहे 

प्रतिनिधी /पणजी :

 गोव्याची राजकीय स्थिती स्थिर असून पर्रीकर हे सर्वमान्य असे नेते आहे. जरी पर्रीकर आजारी असले तरी ते एका महिन्यात गोव्यात येऊन सरकारी सुत्रे हातात घेऊ शकतात, असे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व गोवा प्रभारी अविनाश खन्ना यांनी व्यक्त केले. सध्या ते गोव्यात भाजपचा आढावा घेण्यासाठी आले असून त्यांनी rकाल तरुण भारत कार्यालयायला भेट दिली यावेळी ते बोलत होते.

 गोव्याच्या भाजपच्या नेत्यांसोबत काल बैठक घेतली आहे. सर्व मंत्री आमदारांच्या समस्या जाणून घेतल्या आहे. पर्रीकरांनी गोव्यात केलेला विकास हा त्यांच्या कामाचा पुरावा आहे. गोव्यात भाजपचे नेते हे केडरमधून आलेले आहे. आता भाजपचा बुथ स्थरावरही बैठका होणार आहे, सर्व कार्यकत्यांच्या समस्या जाणून घेणार आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.

 सध्या कर्नाटकात होणाऱया विधानसभा निवडणूकीत भाजपचा वरचस्मा असून अनेक भाजपचे राष्ट्रीय नेते कर्नाटकातील प्रत्येक मतदासंघामध्ये दौरे करुन लोकांच्या समस्या जाणनू घेत आहेत. गोव्यात जसे पर्रीकर हे लोकप्रीय भाजपचे नेते आहेत तसेच कर्नाटकात येडुयुरोप्पा हे लोकप्रीय नेते आहे. जर कर्नाटकात भाजपचे सरकार आले तर गोवा व कर्नाटकातील म्हादईचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असेही ते पुढे म्हणाले.

 2014 झाली लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद मोदी हा चेहरा होता तसेच आता पुढच्यावर्षी होणाऱया लोकसभा निवडणूकीत त्यांचा चेहर व त्यांचे कार्य हे उपयोगी पडणार आहे. कांग्रेसकडे मोदीला विरोधक असा नेता नसून कॉंगेस सर्व क्षेत्रात अपयशी ठरत आहे. मोदींच्या अध्यक्षतेखाली देश विकासाकडे वाटचल करत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर व भाजपचे माध्यम प्रसिद्धी विभागाचे समन्वयक संदेश सादले उपस्थित होते. यावेळी तरुण भारत गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी आवृत्ती प्रमुख विजय पाटील, मुख्य प्रतिनिधी महादेव खांडेकर, जाहीरात व्यवस्थापक रवी पाटील, पत्रकार विजय मळीक, औदुंबर शिंदे, शैलेश तिवरेकर, नारायण गावस व यशवंत सावंत उपस्थित होते.

Related posts: