|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मुलांना वाढवावे कसे हे पुस्तक पालकांसाठी अत्यावश्यक-ल.म.कडू

मुलांना वाढवावे कसे हे पुस्तक पालकांसाठी अत्यावश्यक-ल.म.कडू 

प्रतिनिधी / सातारा

जशा पालकांच्या मुलांकडून अपेक्षा असतात तशाच अगदी पाचव्या वर्षापासून मुलांच्या मनात अपेक्षा असतात. त्या समजून घेवूनच त्यांना हळूहळू शिकवावे लागते, संस्कारित करावे लागते ही प्रक्रिया मुले 18 वर्षाची होईपर्यत निरंतर चालू असते. त्यादृष्टीने मार्गदर्शन करणाऱया 42 मान्यवर तज्ञांच्या लेखांचे मुलांना वाढवावे कसे हे पुस्तक प्रत्येक पालकाला अत्यावश्य आहे, असे मत साहित्य अकादमी सन्मानित बालसाहित्यकार आणि चित्रकार ल.म.कडू यांनी काढले.

येथील कौशिक प्रकाशनच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रातील मनोविकास व बालविकास क्षेत्रातील 42 मान्यवरांचे लेख समाविष्ट असणारा एकमेव असा लेखसंग्रह मुलांना वाढवावे कसे, या पुस्तकाचे प्रकाशन नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. 

याप्रसंगी कडू पुढे म्हणाले की, कौशिक प्रकाशनच्यावतीने अरूण गोडबोले यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे हे 168 वे पुस्तक आहे. या प्रकाशनच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी उपस्थित होते. कारण त्याचे मुखपुष्ठ मी तयार केले होते. त्यामुळेच गोडबोले यांनी कडूंना बोलावले यात त्यांचा गोड स्वभाव दिसतो असेही कडू म्हणाले. 

या कार्यक्रमात पुस्तकात लेखन केलेल्या लेखकापैकी डॉ. अर्चना परूळकर मुंबई, सौ. संजना तावडे कोल्हापूर, प्रा.संध्या चौगुले व डॉ. गौरी ताम्हणकर कराड यांनीही मनोगते व्यक्त करताना या पुस्तकामुळे मनातील विचार व्यक्त करायला संधी मिळाल्याचे, पालकांना मार्गदर्शन करण्याचे सांगून कौशिक प्रकाशनचे कौतूक केले.

कार्यक्रमास माजी आयुक्त डी.एन.वैद्य, अध्यक्षस्थानी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रद्मुम्न गोडबोले यांनी आपल्या खुमासदार शेलीत केले.

प्रकाशन सोहळयास मान्यवर लेखकांसह प्राचार्य पुरूषोत्तम शेठ, दादा निगडीकर, डॉ. रविंद्र हर्षे, प्रा.अविनाश लेवे, प्रा.सौ.शैलजा माने, डॉ. चित्रा दाभोलकर, संदेश शहा, रमेश आगाशे, सौ. अनुपमा गोडबोले, उदयन गोडबोले, प्रशांत गुजर, सौ. संजीवनी गोडबोले, डॉ. अच्यत गोडबोले  अरविंद भावे, भास्कर परांजपे, गौतम भोसले, अनिल काटदरे यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.