|Friday, November 15, 2019
You are here: Home » leadingnews » यशवंत सिन्हांचा भाजपाला रामराम

यशवंत सिन्हांचा भाजपाला रामराम 

ऑनलाईन टीम / पटना :

ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अखेर भाजपाला रामराम ठोकला आहे. देशातील लोकशाहीची स्थिती चिंताजनक असून, राष्ट्र विचार मंच स्थापन करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे.

नोटाबंदी, जीएसटीसह भाजपाच्या फसलेल्या निर्णयांवर टीका करीत सिन्हा यांनी मध्यंतरी मादी सरकारविरोधात रान उठवले होते. त्याचबरोबर शेतकऱयांच्या प्रश्नांवर आंदोलनही केले होते. त्याबद्दल त्यांना अटकही झाली होती. या पार्श्वभूमीवर सिन्हा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, देशातील स्थिती चिंताजनक आहे. विरोधी विचारांना कोणतेही स्थान नसून, लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे भाजपातून आपण बाहेर पडत आहोत. आता राष्ट्र विचार मंच स्थापन करणार आहे. मात्र, भविष्यात आपण कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.

 

Related posts: