|Thursday, June 27, 2019
You are here: Home » मनोरंजन » रवी जाधवचा ‘न्यूड’ अखेर होणार प्रदर्शित

रवी जाधवचा ‘न्यूड’ अखेर होणार प्रदर्शित 

  गेल्या काही महिन्यांपासून ‘न्यूड’ (चित्रा) या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. चित्रपटाच्या नावावरूनही अनेकांच्या मनात कुतूहलाची भावना जागी झाली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असून झी स्टुडिओज् येत्या 27 एप्रिलला तो महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांतील प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.

   चित्रपटात मुलाच्या शिक्षणसाठी धडपड करताना एका कला महाविद्यालयात ‘न्यूड मॉडेल’ म्हणून काम करणाऱया यमुनेनी (कल्याणी मुळेंनी) खऱया आयुष्यात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् महाविद्यालयात गेली 30 वर्ष ज्ञानदानाचे हेच काम  करणाऱया लक्ष्मी यांना बोलते केले. लक्ष्मी यांनी त्यांना या प्रवासात आलेले अनुभव कथन केले. त्या म्हणाल्या, मला माझ्या कामाचा सार्थ अभिमान आहे. मला विद्यार्थ्यांनी इथे देवाचा दर्जा दिला आणि आता या विषयावर सिनेमा येऊ घातलाय. प्रेक्षकांसमोर आमची कथा मांडली जाणार आहे. यासारखा दुसरा आनंद नाही.

  न्यूड मॉडेल हे कला क्षेत्रातील वास्तव असल्यामुळे या संज्ञेकडे साशंकतेने पाहणे हे त्या कलाकृतीवर अन्याय करणारे आहे. घराप्रमाणेच चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या मनातही एक उंबरठा असतो. त्यामुळे न्यूड (चित्रा) चित्रपटाविषयीचे धुके लवकरच निवळेल, असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्यक्त केला. मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मी निर्माण करीत असलेल्या कलाकृतींमध्ये अश्लीलता नाही तर कलात्मकताच असेल, याची खात्री बाळगावी, असेही त्यांनी सांगितले. ‘अथांश कम्युनिकेशन्स’ आणि ‘झी स्टुडिओज’ यांनी न्यूड (चित्रा) चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. या चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून पटकथा आणि संवाद सचिन कुंडलकर यांनी लिहिले आहेत. रवी जाधव दिग्दर्शित या सिनेमाचे अप्रतिम छायाचित्रण तर अमलेंदू चौधरी यांनी तर संकलन केले आहे. अभिजीत देशपांडे यांनी कथेला अनुसरून कला-दिग्दर्शन करण्याची जबाबदारी संतोष फुटाणे आणि महेश साळगावकर यांनी पेलली असून वेशभूषा साकारली आहे. मेघना जाधव यांनी. सौरभ भालेराव यांचे पार्श्वसंगीत चित्रपटात असून सायली खरे आणि विद्या राव यांनी वैयक्तिकरित्या या चित्रपटात दोन गाणी लिहिली असून स्वरबद्धही केलेली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये न्यूड चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आणखी एक चौकटीबाहेरील कथानक मोठय़ा पडद्यावर पाहता येणार आहे.