|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कारागृहात मोबाईलचा वापर, गुन्हा दाखल

कारागृहात मोबाईलचा वापर, गुन्हा दाखल 

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह वर्ग 2 येथे संशयित आरोपी संजय जाधव याच्याकडे मोबाईल सापडला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी हा कारागृहातील शौचालयमध्ये मोबाईल वापरत असल्याचे समोर आल्यानंतर कारागृह पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे मोबाईल सापडला. रविवारी दुपारी उशिरापर्यंत पंचनामा करुन सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत प्राथमिक माहिती अशी, सातारचे जिल्हा मध्यवर्ती कारागृह शहर पोलीस ठाण्यालगतच आहे. रविवारी या कारागृहातील जाधव या संशयित आरोपीकडे मोबाईल असल्याचे समोर आले. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ संशयिताची झाडाझडती घेतली असता मोबाईल त्याच्याकडे मोबाईल मिळाला. अनधिकृतरित्या मोबाईल सापडल्याने कारागृह पोलिसांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Related posts: