|Sunday, November 17, 2019
You are here: Home » Top News » भाजपापासून मुलींना वाचवा : राहुल गांधी

भाजपापासून मुलींना वाचवा : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

देशभरात मुलींवरील आत्याचाराच्या घटना वाढत असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सुरूवातीला ‘बेटी पढाओ, बेटी बचाव’,असा सरकारचा नारा होता.पण पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या मुलींचे रक्षण करण्यात अपयशी ठरले. आता ‘भाजापापासून मुलींना वाचवा’,असा नवा नारा देण्याची वेळ ओढावल्याची टीका त्यांनी केली.

दिल्लीतील तालकटोरा मैदानात सोमवारी काँग्रेसतर्फे संविधान बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संबोधित केले. मोदी सरकारच्या धोरणांचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पुस्तकात म्हटलंय की वाल्मिकी समाजातील व्यक्ती जे काम करतात ते फक्त पोट भरण्यासाठी नसते. ते अध्यात्मासाठी हे काम करतात. यातून मोदींची मानसिकता दिसून येते. त्यांच्या मनात दलितांसाठी जागाच नाही, असे राहुल गांधींनी सांगितले. मोदींच्या मनात गरीब, महिला आणि दलितांसाठी जागा नाही. देशात दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. या देशाचे संविधानच महिला, दलित आणि गरीबांचे रक्षण करणार, असे त्यांनी सांगितले.

 

Related posts: