|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सांगे उपनिरीक्षकाच्या कृतीचे स्थानिक ग्रामस्थांकडून समर्थन

सांगे उपनिरीक्षकाच्या कृतीचे स्थानिक ग्रामस्थांकडून समर्थन 

प्रतिनिधी /सांगे :

सांगे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सुदिन रेडकर यांनी अंगावर खाकी वर्दी असताना देखील तिचे भान न ठेवता, दापोडे-भाटी येथे साळावली जलाशयात बुडून मृत्यू पावलेल्या एका युवकाच्या मित्राला मारहाण केली होती. या प्रकरणी उपनिरीक्षक रेडकर यांची सांगे पोलीस स्थानकावरून, गोवा राखीव पोलीस दलात बदली झाली. मात्र, काल स्थानिक ग्रामस्थांनी उपनिरीक्षक सुदिन रेडकर यांच्या कृतीचे जोरदार समर्थन केले व त्याची कृती गैर नव्हती असा दावा केला.

उपनिरीक्षक सुदिन रेडकर हे प्रेत जवळ असताना देखील एका युवकाला लाथानी मारहाण करतात तसेच शिवीगाळ करतानाचा एक व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला होता. या संदर्भात दापोडे गावचे ग्रामस्थ अशोक परवार म्हणाले की, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी मयत सिद्धेश मुली यांचे मित्र दारू पित होते. त्यांनी जर वेळीच हालचाल केली असती तर कदाचित सिद्धेशला जलाशयात बुडून मृत्यू आला नसता, जेव्हा या प्रकाराची माहिती सांगे पोलिसांना कळली, तेव्हा त्यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक सुदिन रेडकर यांनी त्यांच्याकडून मयताची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, पण ते सहकार्य करत नव्हते. उलट त्यातील एकटा उपनिरीक्षक रेडकर यांच्यावर भडकला. त्यामुळे  उपनिरीक्षक सुदिन रेडकर हे संतप्त झाले व त्यांच्याकडून लाथ मारण्याचा व शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. यात गैर असे काहीच नव्हते.

जलाशयातील प्रेत काढण्यासाठी अग्नीशमन दलाची मदत घेण्यात आली. अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी आले व त्यांनी देखील बघ्याची भूमिका घेतली. यावेळी उपनिरीक्षक रेडकर यांनी पाण्यात उतरून मृतदेह काढण्याची तयारी सुरू केली. यावेळी आपण त्यांना रोखले व आपण स्वता पाण्यात उतरून इतरांच्या सहकार्याने प्रेत जलाशयातून काढल्याचा दावा अशोक परवार यांनी केला.

Related posts: