|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » ‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार

‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार 

ऑनलाईन टीम / धुळे :

लालपरी अर्थात एसटी महामंडळ येत्या एक मेपासून स्मार्ट होणार आहे. एसटी महामंडळ प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड म्हणजेच कॅशलेश योजना घेऊन येत आहे. यास्sंबंधी काही तांत्रिक पूर्तता येत्या काही दिवसात पूर्ण झाल्यानंतर एक मेपासून या योजनेची अमलबजावणी करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.

महाराष्ट्र दिनाचे मुहूर्त साधूत 1 मे रोजी प्रत्येक जिल्हय़ातील पालकमंत्र्यांच्या हस्ते हे कार्ड प्रवाशांना वाटप होणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काही दिवसांपूर्वी या स्मार्ट कार्डची घोषणा केली होती. याची अंमलबजावणी 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून केली जाईल, असे जाहीर केले होते. एसटीच्या प्रवासात तिकीट काढताना सुट्टय़ा पैशांवरून वाद अनेकदा होत असतात. या सर्वातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. त्यानुसार ठराविक रकमेचे स्मार्ट कार्ड घेऊन त्याद्वारे त्या रकमे इतका एसटीचा कोणताही साधी, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेध बसेसने प्रवास करणे प्रवाशांना शक्मय होणार. त्यामुळे खिशात सुट्टे पैसे आहेत की नाहीत, याची चिंता करण्याची प्रवाशांना आवश्यकता नाही.

हे स्मार्ट कार्ड एका व्यक्तीने काढले तरी त्याच्या कुटुंबातील आणि मित्रांपैकी कुणीही प्रवासाला जाताना हे कार्ड वापरू शकतात. तसेच कितीही व्यक्तींची तिकिटे काढू शकतात. अर्थात, प्रत्येक व्यक्तीने जितका प्रवास केला तितके पैसे त्या कार्डमधून वजा होतील. हे कार्ड नंतर रिचार्ज करावे लागेल. नेट बँकिंग, डेबिट/पेडिट कार्ड, ई-वॉलेट या माध्यमातून हे कार्ड रिचार्ज करता येणार आहे. ऑनलाईन रिझर्व्हेशन, एसटी कंट्रोल रूममधून देखील या कार्डच्या माध्यमातून रिझर्व्हेशन करता येणार आहे. एसटीच्या या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून वीज बिल, मोबाईल रिचार्ज, डिश टीव्ही रिचार्ज आणि ऑनलाईन शॉपिंग करता येईल, असा दावाही एसटी प्रशासनाने केला. या योजनेंतर्गत प्रवाशांना 50 रूपयांमध्ये स्मार्ट कार्ड दिले जाईल. त्यावर सुरूवातीला किमान 500 रूपये भरणे आवश्यक आहे. त्यानंतर पुनर्भरणा रक्कम ही 100 रूपये एवढी असेल. या योजनेचा लाभ प्रवाशांना येत्या महाराष्ट्र दिनापासून (1 मे, 2018 पासून) आपल्या जवळच्या प्रत्येक आगारात जाऊन घेता येईल.

 

Related posts: