|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोंयचो आवाज संघटनेने माफी मागावी, अन्यथा खटला दाखल करणार- आमदार एलिना साल्ढाना

गोंयचो आवाज संघटनेने माफी मागावी, अन्यथा खटला दाखल करणार- आमदार एलिना साल्ढाना 

वार्ताहर /झुआरीनगर :

कासावलीतील 200 चौ. मी. जमीनीचे बेकायदेशीर रूपांतर केल्याचा आरोप कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यांनी फेटाळला आहे. या विषयी काल सायंकाळी त्यांनी पत्रकार घेतली व गोंयचो आवाज या संघटनेने केलेले आरोप चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. आपले नाव बदनाम करणाऱया या संघटनेने जर आपली माफी मागितली नाही तर येणाऱया 48 तासांत आपण या संघटनेवर अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले.

मडगांवच्या लोहिया मैदानावर गोंयचो आवाज या संघटनेने राजकीय नेत्यानी बेकायदेशीर भू-रूपांतर केल्याच्या आरोपात आमदार एलिना साल्ढाना यांनाही गोवण्यात आले होते. कासावलीतील ज्या जागेसंदर्भात त्यांच्यावर करण्यात आला होता, त्याविषयी त्यांनी कायदेशीर कागदपत्रांसह माहिती दिली. गोंयचो आवाज या संघटनेने आपल्यावर केलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. कासावलीतील भू सर्व्हे क्र. 85/7 व 76/9 ही जागा माथानी साल्ढाणा यांच्या नावे आहे. प्रादेशीक आराखडा 2021 च्या रचनेला 2007 पासून सुरवात झाली आणि त्यावेळेस माथानी साल्ढाणा आमदार नव्हते तसेच आपलाही काही संबंध नव्हता. पुढे 2009 साली कासावली-आरोसी-कुएली पंचायतीने या आराखडय़ाबद्धल आपला विरोध दर्शवून काही सुचना मांडल्या. हा विषय सभेत मांडून पंचायतीने आपले मत नगरनियोजन मंडळाला कळविले. यावेळी माथानी साल्ढाणा कासावली गावच्या लोकांबरोबर राहिले व  प्रादेशीक आराखडय़ाला विरोध दर्शविला व त्यात काही बदल करावे असे त्यांनी सुचविले होते. त्यांनी केलेल्या या विरोधात भू सर्व्हे क्र.  85/7 व 76/9 जागेत दाखविणाऱया पार्किंग तसेच दहा मीटरचा रस्ता रूंदीकरणाचाही समावेश होता. पुढे 2015 साली जेव्हा नगरनियोजन खात्याचे मंत्री फ्रान्सिस डिसोजा होते, त्यावेळी हा आराखडा मान्यतेस पुन्हा पंचायतीत आला. त्यावेळी आपणही माथानी साल्ढाणा यांनी केलेल्या सुचनावर ठाम राहून कासावली पंचायतीसोबत विरोध दर्शविला असे एलिना साल्ढाणा यांनी सांगितले.

Related posts: