|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य वृद्धांचा मान ठेवाल तर शनिची कृपा लाभेल!

राशिभविष्य वृद्धांचा मान ठेवाल तर शनिची कृपा लाभेल! 

बुध. 9 ते  15 मे 2018

मनुष्य प्राण्याच्या हातून घरी वाईट जी कृत्ये घडतात त्याचा अधिपती शनि आहे. पत्रिकेत शनि शुभ असेल तर त्याचे कर्म शक्मयतो बिघडत नाही  व जर तो दूषित असेल तर स्वत:चे कर्म कोणत्या ना कोणत्या स्वरुपात नक्कीच बिघडते. कर्म तसे फळ हा त्याचा स्वभाव आहे. न्यायदेवता असल्याने त्याच्यापासून काहीही लपत नाही. तो जर खूष झाला तर 42 पिढय़ांचा उद्धार करील व चिडला तर अंगावर वस्त्रही ठेवू देणार नाही. त्याची दृष्टी पडे जयावर करी त्याचा चकणाचूर असे म्हटले जाते. मुनष्यप्राणीच नव्हे तर देव दानव सर्व ग्रह तारे यासह चरावर सृष्टीला त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यासाठीच शनि म्हटले की सर्वांच्या अंगावर काटा उभा राहतो. नाहक भीती वाटू लागते. त्यातच टी. व्ही. वर शनि बद्दल कोणी ना कोणी, काही ना काही तरी बोलतच असतात. शनि म्हणजे वाईट, खराब, प्रत्येक बाबतीत विलंब त्यातच शनिची दृष्टी, शनिचा प्रभाव वगैरे वगैरे म्हणजेच थोडक्मयात लोकांना भरपूर घाबरवले जाते पण खरे सांगायचे झाले तर शनिसारखा प्रामाणिक, न्याय देणारा, आध्यात्मिक, सचोटीने व सातत्याने काम करणारा, असा दुसरा कोणताही ग्रह नाही. शनि संस्काराचा बराचसा भाग पत्रिकेत दाखवत असतो. हा ग्रह पूर्वकर्माचा व प्रारब्धाचा कारक आहे. पण त्याचबरोबर कष्ट करण्याची, दीर्घोद्योगाची चिकाटी शनिजवळ आहे. मोठमोठी, प्रचंड, यशस्वी, दूरगामी करणारी कामे शनिच करू शकतो. शनि हा वृद्ध व्यक्तीचा कारक ग्रह आहे. जेव्हा तुमच्याकडून आई वडिलांची किंवा कुठल्याही वृद्ध व्यक्तींची सेवा होते, त्यांना अपशब्द बोलले जात नाही तेव्हा शनिची कृपादृष्टी तुमच्यावर पडायला वेळ लागत नाही. साडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. साडेसातीत काही लोकांवर कठीण प्रसंग येतात हे खरं असलं तरी याच काळात आपलं कोण आणि परकं कोण याची नव्याने ओळख होते. म्हणजे शनि चिकाटी आणि सहनशीलता वाढवतो ज्याचा अंतिमत: आपल्याला फायदाच होतो. 

मेष

बुधाचे तुमच्या राशीत झालेले आगमन काही तरी लाभ देऊन जाईल. पण विसराळूपणामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी गहाळ होण्याची शक्मयता आहे. तुमच्या राशीतच अमावास्या होत आहे. अनेक बाबतीत गोंधळाचे वातावरण निर्माण होईल. दूरचे प्रवास व वाटाघाटी टाळा. हाती घेतलेले काम पूर्ण होईलच असे  नाही. मन सांभाळणे व कर्तव्य पार पाडणे दोन्हीही गोष्टी साध्य होतीलच असे नाही.


वृषभ

बाराव्या स्थानी आलेला बुध व तेथेच होत असलेली अमावास्या काही तरी खळबळ माजविण्याची शक्मयता आहे. स्वार्थासाठी तुमचा वापर केला जाईल. यासाठी सावध रहा. नको त्या कामासाठी काही लोक महत्त्वाचे निर्णय घेण्यास भाग पाडतील, पण ते निर्णय त्रासदायक ठरतील हे लक्षात ठेवावे. कुणी कितीही सांगितले तरी राजकारण अथवा आर्थिक गुंतवणूक किंवा स्थलांतराच्या निर्णयाबद्दल काहीही ठरवू नका. अनावश्यक किमती वस्तू खरेदी करू नका. अथवा कुणाला देऊ नका.


मिथुन

लाभात आलेला बुध व मंगळवारची अमावास्या शुभ योगात आहे. सर्व बाबतीत यश देणारी आहे. अत्यंत महत्त्वाचे निर्णय घ्याल पण तरीही काळजी घ्यावी. आर्थिक परिस्थितीला शुभ कलाटणी मिळेल. काही नवीन कामांची सुरुवात कराल. नोकरी व्यवसायासाठी अनुकूल काळ आहे. घर अथवा वाहन घेण्याची क्षमता प्राप्त होईल.


कर्क

दशमातील बुध व मंगळवारची अमावास्या सर्व दृष्टीने लाभदायक आहे. मनातील अनेक गोष्टी साध्य होतील. मंगल कार्यात भाग घ्याल. आर्थिक गुंतवणुकीचा फायदा मिळेल. अमावास्येनंतर बऱयाच अडलेल्या कामात यश मिळेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. काही कामात विलंब झाल्याने मतभेदाचे प्रसंग येतील.


सिंह

भाग्यस्थानी होणारी अमावास्या व तेथे आलेला बुध हे ग्रहमान संमिश्र आहे. समोर मोठे यश व पैसा दिसेल पण हाती मात्र काहीच लागणार नाही. नोकरीत पगारवाढ व प्रमोशनचे योग दिसत असताना अचानक गैरसमज निर्माण होऊन नोकरी जाण्याचे अथवा बदलीचे प्रसंग येतील. यासाठी या आठवडय़ात सर्व बाजूने विचार करून, मन शांत ठेवूनच निर्णय घ्यावेत.


कन्या

गुरुकृपेमुळे सतत आर्थिक लाभ होत राहतील. अनेक बाबतीत ग्रहमान चांगले आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात करू शकाल. एकाचवेळी अनेक कामे स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल. कामाच्या ताणामुळे नोकरीकडे दुर्लक्ष होण्याची शक्मयता. बदललेला बुध व अमावास्या मृत्यूस्थानी आहे. वाहन जपून चालवा राजकारणात असाल तर मतभेदाचे प्रसंग शक्मयतो टाळण्याचा प्रयत्न करा.


तुळ

 बदललेला बुध व अमावास्या सप्तमात आहे. वैवाहिक जीवनातील काही समस्या उग्र स्वरुप धारण करतील. विवाह ठरविताना मुला मुलीच्या मनात काय आहे. त्याचा मागोवा घ्या. मगच निर्णय घ्या. व्यावहारिक बाबतीत चांगले योग आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या कोणत्याही कामाची सुरुवात करण्यास हरकत नाही. आर्थिक व्यवहार मात्र जपून करावेत. काही जुन्या प्रकरणातून सुटका होईल. घरात अनेक तऱहेच्या सुधारणा होतील.


वृश्चिक

अडलेली कामे होऊ लागतील. एखादे काम मोठे लाभदायक ठरेल तर काहीवेळा ठरवून केलेली महत्त्वाची कामे फिसकटतात. धनलाभ व संततीचे चांगले योग. विवाह कार्याच्या वाटाघाटीत उत्तम यश मिळेल. सहाव्यास्थानी आलेला  बुध व तेथेच होणारी अमावास्या शारीरिक दगदग वाढवील व शत्रुचा त्रासही दाखवून देईल.


धनु

पंचमात अमावास्या होत आहे. नव्या पाहुण्यांचे आगमन होईल व ते पूर्वजांशी संबंधित असेल. पूर्वजांच्या बाबतीत काही चुकले असेल तर ते सुधारण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे अनुकूल वातावरण राहील. पण महत्त्वाच्या कामात यश मिळेलच असे नाही. घाई गडबडीमुळे मोठय़ा प्रमाणात गफलती होण्याची शक्मयता आहे. त्यासाठी निर्णय घेताना दहावेळा विचार करा. प्रेमप्रकरणे असतील तर जरा काळजी घ्यावी.


मकर

बुधाचे चुतर्थातील भ्रमण वास्तुविषयक अडलेल्या कामांना गती देईल. सुखस्थानी अमावास्या चांगली नाही हा अनिष्ट योग असल्याने एखादी बाधिक जागा अथवा वस्तू गळय़ात पडण्याची शक्मयता. जे चालले आहे ते चालू द्या. त्यात नवीन काहीही भर घालू नका. ज्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही त्यात लक्ष घालू नका. मतभेद व अतिरेक टाळण्याचा प्रयत्न करावा.


कुंभ

लाभस्थानी आलेला बुध व तेथेच होत असलेली अमावास्या शुभयोगात आहे. धनलाभ व नव्या कामांची कंत्राटे मिळतील. शत्रुंच्या बाबतीत ग्रहमान अत्यंत विचित्र आहे. आपले कोण परके कोण हे ओळखून वागा. महत्त्वाच्या कामात तुमचा निर्णय मोलाची भूमिका बजावेल. या संधीचा फायदा घ्या व शत्रुत्व मिटविण्याचा प्रयत्न करा. पुढे ते फायदेशीर ठरेल.


मीन

धनस्थानी होणारी अमावास्या व तेथेच आलेला बुध हा योग आर्थिक बाबतीत अडचणी निर्माण करील. कुणाच्या सांगण्यावरून अनावश्यक तसेच जुन्या वस्तू खरेदी करू नका. कर्तव्य व प्रति÷ा तसेच मानसन्मान व पैसा या सर्व बाबी योग्य रितीने हाताळूनच व्यवहारी कामे करावी लागतील. मंगळ, केतू लाभात असल्याने मित्र मंडळीच्या मागे लागून व्यसन वगैरे करू नका. अन्यथा पुढे गंभीर समस्या निर्माण होतील.