|Monday, February 24, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

मिथुनमध्ये शुक्र व वृषभेत सूर्य प्रवेश करीत आहे. या सप्ताहात तुमची सर्व कामे तुमच्या मनाप्रमाणे होतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. लोकप्रियता मिळेल. सोडून गेलेले लोक परत येतील. शेतकरी वर्गाला दिलासा देणारी घटना घडेल. व्यवसायात जम बसेल. पैसा जमा करा, संसारातील गैरसमज व तणाव मिटेल. नातलग भेटतील. कला- क्रीडा क्षेत्रात चमकाल. परीक्षेत यश मिळेल.


वृषभ

सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी आल्यातरी त्यानंतर मात्र तुमच्या समस्या कमी होतील. मिथुनेत शुक्र व तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश करीत आहे. नोकरीचा प्रश्न सुटेल. राजकीय, सामाजिक कार्याला दिशा मिळेल. वरि÷ांची नाराजी दूर करता येईल. शेतकरी वर्गाचा प्रश्न सुटण्यास मोठे लोक मदत करतील. आर्थिक फायदा होईल. धंद्यात वाढ होईल. संसारातील वाद मिटण्याची शक्मयता वाढेल. कार्याला प्रसिद्धी मिळेल.


मिथुन

स्वराशीत शुक्र व वृषभेत सूर्याचे राश्यांतर होत आहे. बुधवारी, गुरुवारी तुमच्या प्रति÷sचा प्रश्न निर्माण होईल. राजकीय – सामाजिक कार्यात विरोध होईल. आरोप येतील. पुढारीपण करणाऱया व्यक्तीला भास होईल. शेतकरी वर्गाला संताप होऊ शकतो. तात्पुरता प्रश्न राहील. संसारात वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. नम्रता ठेवा. क्रीडा क्षेत्रात दुखापत संभवते. नोकरीच्या ठिकाणी चूक टाळा.


कर्क

सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. मिथुनेत शुक्र व वृषभेत सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात जवळच्या व्यक्ती समवेत शुक्रवारी वाद होईल. प्रति÷ा वाढवण्यासाठी मेहनत घ्या. योजना पूर्ण करा. तुमच्या नेतृत्वाला उठाव येईल. शेतकरी वर्गाला मनस्ताप झाला तरी प्रश्नाला उत्तर मिळेल. संसारात संतापजनक घटना घडू शकते. क्रीडा क्षेत्रात चमकाल.


सिंह

या सप्ताहात तुमचे वर्चस्व सर्वच ठिकाणी वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात उत्साहवर्धक घटना घडेल. आत्मविश्वासाने लोकांच्या समस्या सोडवता येतील. शेतकरी वर्गाला आशादायक वातावरण राहील. गुप्त कारवायांचा सामना करता येईल. लोकांचे प्रेम मिळेल. घरातील व्यक्तींना खूष ठेवता येईल. शुभ कार्य ठरेल. कला, क्रीडाक्षेत्रात पुरस्कार व लाभ मिळेल.


कन्या

मनावरील ताण बुधवारपासून कमी होईल. जुने मित्र भेटतील. चर्चा सफल होईल. धंद्यात वाढ करता येईल. मिथुनेत शुक्र व वृषभेत सूर्य प्रवेश होत आहे. राजकीय, सामाजिक कार्याला वेग येईल. योग्य निर्णय घेण्याचा आत्मविश्वास येईल. अचूक अंदाज बांधता येईल. शेतकरी वर्गाचे नुकसान भरून निघेल. घरातील वातावरण आनंदी राहील. शेअर्स वधारेल.


तुला

मिथुन राशीत शुक्र व वृषभेत सूर्य प्रवेश करीत आहे. तुम्ही जिद्द ठेवा. प्रयत्न करा. अडचणी येतील. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात जबाबदारी वाढेल. तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक वाढतील. शेतकरी वर्गाचा संताप होईल. प्रश्नांची चिंता वाटेल. सर्व तात्पुरते असेल. आश्वासन मोठय़ा व्यक्ती देतील. आप्तेष्ट-मित्र यांची मदत मिळेल. खंबीर रहा. सूर्य उपासना फायद्याची ठरेल.


वृश्चिक

संमिश्र स्वरुपाच्या घटना घडतील. मनावर दडपण राहील. धावपळ दगदग होईल. मिथुनेत शुक्र व वृषभेत सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांचा जोर वाढेल. लोकप्रियता कमी होईल प्रति÷ा जाणार नाही. धंद्यात वाढ होईल व खर्चही होईल. संसारात मिळते- जुळते धोरण ठेवा. मैत्रीत गैरसमज होऊ शकतो. खाण्याची काळजी घ्या.


धनु

आपले वाटणारे लोक सहजगत्या तुमच्या विरोधात जाण्याची शक्मयता आहे. राजकीय, सामाजिक कार्यात चौफेर सावध रहा. स्वत:चे काम नीट तपासून घ्या. चूक टाळा. धंद्यात लक्ष घाला. डोळय़ांची काळजी घ्या. बुधवार, गुरुवार मनाविरुद्ध काम करावे लागेल. तुमचे मुद्दे पटवणे कठीण होईल. घरातील व्यक्तींचे साहाय्य मिळेल.


मकर

मिथुनेत शुक्र व वृषभेत सूर्याचे राश्यांतर तुमच्या कार्याला कलाटणी देणारे ठरेल. शुक्रवार, शनिवार तुमच्या विरोधात टिका होईल. राजकीय, सामाजिक कार्याला गती मिळेल. दौऱयाचे काम करून घ्या. लोकांशी बोलतांना थोडी काळजी घ्या. तुमच्या बोलण्याचा अर्थ न समजल्यामुळे गैरसमज होऊ शकतो. धंद्यात वाढ होईल. घरातील वातावरण तणावाचे वाटेल. खंबीरपणे प्रश्न सोडवाल.


कुंभ

तुम्ही ठरविलेल्या कार्यक्रमात बदल करण्याची वेळ येऊ शकते. रागावर ताबा ठेवा. तुम्ही शब्द दिल्यास तो पाळणे कठीण होईल. मिथुनेत शुक्र व वृषभेत सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मतभेद होऊ शकतात. वरि÷ांचे कान भरण्याचा प्रयत्न तुमच्या विरोधात होऊ शकतो. प्रवासात सावध रहा. नोकरीत कामाचा व्याप व ताप राहील.


मीन

 अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवता येईल. मिथुनेत शुक्र व वृषभेत सूर्य प्रवेश करीत आहे. व्यवसायात जम बसेल. शेतकरी वर्गाला फायदा होईल. पैसा मात्र जपून ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात वर्चस्व राहील. अधिकार मिळेल. थकबाकी  वसूल करा. घरात शुभ समाचार मिळेल. नवीन ओळख वाढेल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल व लाभ मिळेल.

Related posts: