|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » leadingnews » कर्नाटक निवडणूक निकाल : कुमारस्वामी यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड

कर्नाटक निवडणूक निकाल : कुमारस्वामी यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड 

ऑनलाईन टीम / बेंगळुरू :

कर्नाटक विधानसभेवर कुणाचा झेंडा हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होत आहे.  कर्नाटकच्या 224 सदस्य असलेल्या विधानसभेच्या 222 जागांसाठी 12 मे रोजी 72.13 टक्के मतदान झाले. 

LIVE UPDATES

 • जेडीएस आमदारांच्या बैठकीत एचडी कुमारस्वामी यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड
 • मला दोन्ही बाजूची ऑफर. मात्र 2004 आणि 2005 मध्ये मी भाजपसोबत गेल्याने, माझ्या वडिलांच्या कारकिर्दीवर काळा डाग पडला. देवाने मला तो डाग पुसण्याची संधी दिली आहे. मी आता काँग्रेससोबत जाणार आहे : कुमारस्वामी
 • मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी यांचे नाव पुढे आले पण काँग्रेसच्याच काही आमदारांनी याला विरोध केला आहे.

 • काँग्रेस-जेडीएसचा सत्तास्थापनेचा प्रस्ताव

 • खरे किंगमेकर तर कर्नाटकचे राज्यपालच !

 • सर्वात कमी जागा, तरीही जेडीएसचा मुख्यमंत्री?

 • भाजप १०४, कॉंग्रेस ७८ ,जेडीएस ३८  तर इतर ०२ जागांवर आघाडी
 • कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी चालणार फोडाफोडीचे सुपरफास्ट राजकारण

 • भाजपा सत्तेत, काही आमदार अनुपस्थित 

 • कर्नाटकला तीन मुख्यमंत्री देणाऱ्या जागेवरुन कुमारस्वामी विजयी

 • काँग्रेस-जेडीएस एकत्र आल्यानं बेंगळुरूपासून दिल्लीपर्यंत राजकीय घडामोडींना वेग.
 • काँग्रेसकडून जेडीएसला मुख्यमंत्रिपदाची ऑफर; भाजपाला रोखण्यासाठी खेळी

 • भाजप १०५, कॉंग्रेस ७७ ,जेडीएस ३८  तर इतर ०२ जागांवर आघाडी
 • भाजप १२२, कॉंग्रेस ५८,जेडीएस ४० तर इतर ०२ जागांवर आघाडी
 • बेंगळुरू येथील भाजपा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. पक्षाचा झेंडा हातात घेऊन घोषणा दिल्या जात आहेत.
 • भाजप ११५, कॉंग्रेस ६१,जेडीएस ४४ तर इतर ०२ जागांवर आघाडी
 • आम्ही बहुमतासाठी आवश्यक ११२ हा आकडा पार केला आहे. त्यामुळे जेडीएसबरोबर आघाडी करण्याचा प्रश्नच नाही: केंद्रीय मंत्री सदानंद गौडा
 • भाजप ११४, कॉंग्रेस ६५,जेडीएस ४१ तर इतर ०२ जागांवर आघाडी
 • भाजप १११, कॉंग्रेस ६९,जेडीएस ४० तर इतर ०२ जागांवर आघाडी
 • भाजप ११०, कॉंग्रेस ६९,जेडीएस ४१ तर इतर ०२ जागांवर आघाडी
 • हुबळी धारवाड मतदारसंघातून भाजपाचे जगदीश शेट्टार यांची आघाडी
 •  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वर आघाडीवर
 • केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची घेतली भेट
 •  वरूणा मतदारसंघातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुलगा यतींद्र यांची आघाडी
 • शिकारीपुरा मतदारसंघातून भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा ३४२० मतांनी आघाडीवर
 • भाजप १०७, कॉंग्रेस ६६, जेडीएस ४५ तर इतर ०२ जागांवर आघाडी
 • भाजप आघाडीनंतर शेअर बाजारात उसळी 
 • भाजप १०४, कॉंग्रेस ६८, जेडीएस ४३ तर इतर ०२ जागांवर आघाडी
 • भाजप ९३, कॉंग्रेस ८१ ,जेडीएस ४० तर इतर ०१ जागांवर आघाडी
 • मुख्यमंत्री सिद्धारामय्या चांमुडेश्वरी मतदारसंघात 11 हजार मतांनी पिछाडीवर
 • भाजप ९८, कॉंग्रेस ६५ ,जेडीएस ३० तर इतर ०१ जागांवर आघाडी
 • भाजप ८५, कॉंग्रेस ७७ ,जेडीएस २७ तर इतर ०१ जागांवर आघाडी
 • भाजप ८३, कॉंग्रेस ७९ ,जेडीएस २५ तर इतर ०१ जागांवर आघाडी
 • भाजप ७९, कॉंग्रेस ७३ ,जेडीएस २५ तर इतर ०१ जागांवर आघाडी
 • भाजप ७५,कॉंग्रेस ६७ ,जेडीएस २४ जागांवर आघाडी  
 • चामुंडेश्वरीमध्ये  सिद्धरामम्या  पिछाडीवर
 • भाजप ४८ , कॉंग्रेस ६१ तर जेडीएस १६  जागांवर आघाडी
 •  पहिला कल काँग्रेसच्या बाजूने, 22 जागांवर आघाडी  
 • काँग्रेसची आगेकूच, भाजप 17, काँग्रेस 21, जेडीएस 10
 • पहिले कल हाती, पोस्टल मतमोजणीत काँग्रेस 12, भाजप 3 तर जेडीएसला दोन जागांवर आघाडी
 • पहिले कल काँग्रेसच्या बाजूने: भाजप 3, काँग्रेस 10, जेडीएस 2
 • मतमोजणी सुरु

Related posts: