|Monday, August 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवजयंती मिरवणुकीला निर्बंधाचा अडसर

शिवजयंती मिरवणुकीला निर्बंधाचा अडसर 

बेळगाव / प्रतिनिधी

प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही शहर व उपनगरांमध्ये भव्य अशी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. शनिवार दि. 19 रोजी बेळगाव तर 18 रोजी वडगाव परिसरात ही भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी व शांतता निर्माण करण्यासाठी नुकतीच एक बैठक शहापूर पोलीस स्थानकात पार पडली. या बैठकीला शहापूर-वडगाव परिसरातील शिवप्रेमी व शहापूर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मे महिन्यात ढकलण्यात आली होती. परंतु शहरात निवडणूक विजयोत्सव मिरवणुकीदरम्यान घडलेल्या अनुचित प्रकारांमुळे शहरात 144 कलम लागू करण्यात आला आहे. हे  कलम शनिवार दि. 18 पर्यंत लागू राहणार असल्याने शिवजयंती कशी साजरी करायची, असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे. याची चर्चा या बैठकीत करण्यात आली.

गुरुवारी मध्यवर्ती महामंडळाची बैठक होणार असून त्यामध्ये हा मुद्दा मांडण्यात येणार आहे. यामध्ये योग्य निर्णय झाल्यानंतर वडगाव शिवजयंतीचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीला शहापूर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, उपाध्यक्ष राजू पाटील, माजी महापौर महेश नाईक, माजी उपमहापौर संजय शिंदे, नगरसेवक राजू बिर्जे, मनोहर हलगेकर, विजय भोसले, दीपक जमखंडी, दिनेश राऊळ, रमेश सोनटक्की, प्रितेश होसूरकर, तानाजी हलगेकर, भाऊ माळवी, शिवाजी बिर्जे, युवराज हाळवण्णावर, अविनाश शिंदे, संदीप पाटील, आकाश धामणेकर, योगेश पाटील, राकेश तळेकर उपस्थित होते.

मध्यवर्ती महामंडळाची आज बैठक

प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही शहर व उपनगरांमध्ये भव्य प्रमाणात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये शेकडो मंडळे सहभागी होत असतात. या चित्ररथ मिरवणुकीचे नियोजन करण्यासाठी गुरुवार दि. 17 रोजी सायंकाळी 5.30 वा. जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोठय़ा संख्येने शिवजयंती मंडळांचे कार्यकर्ते, शिवप्रेमी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे. 

Related posts: