|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘रोहिणी’ नक्षत्राच्या मूहूर्तावर पेरणीसाठी शेतकऱयांची धडपड सुरू

‘रोहिणी’ नक्षत्राच्या मूहूर्तावर पेरणीसाठी शेतकऱयांची धडपड सुरू 

प्रतिनिधी/ बेळगाव

महिनाभर वळिव पावसाने अधुन-मधून हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग खरीप हंगाम साधण्यासाठी मशागतीच्या कामाला लागला आहे. त्यातच काही शेतकरी आपली परंपरा जपत ‘राहिणी’ मूहूर्त साधत 17 मे रोजी रोहिणी नक्षत्रावर पेरणी करण्यासाठी धडपडत आहेत.

यंदा हवामान खात्याने मान्सून लवकर येण्याचे अंदाज व्यक्त केला आहे. अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. सध्या मशागतीचे काम जोरदार सुरू असून, वादळी पावसामुळे सुक्या चाऱयाचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी माळरानावरील जमीन कसण्यात शेतकरी दंग झाला आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱयांतून खरीप हंगामाबाबत समाधान  व्यक्त होत आहे.

अवकाळी पाऊस वेळेवर झाल्यामुळे जनावरांना ओला चारा उपलब्ध करण्यासाठी शेतकरी जोंधळा, मक्का, बाजरीची पेरणी करत आहे. मार्च महिन्यापासून तापमानात कमालीची वाढ झाली होती. मात्र, अधुन-मधून पडणाऱया पावसामुळे गारवा निर्माण होत आहे. काही गावातून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह शेती कामासाठी पाण्याची नितांत गरज असताना अवकाळी पावसाने योग्य वेळी साथ दिल्याने बळीराजा सुखावला आहे. महिन्याभरापासून अधुन-मधून झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग पेरणी पूर्व मशागती करण्यात गुंतला आहे.

Related posts: