|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गळती निवारण्याकडे पाणी पुरवठा मंडळाचे दुर्लक्ष

गळती निवारण्याकडे पाणी पुरवठा मंडळाचे दुर्लक्ष 

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरात एकीकडे पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे तर दुसरीकडे गळतीद्वारे पाणी वाया जात आहे. विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली असून गळती निवारण करण्याकडे पाणी पुरवठा मंडळाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. काही भागातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे.

बेळगाव-वेंगुर्ला रोडशेजारी जलवाहिनीला गळती लागल्याने चार महिन्यांपासून पाणी वाया जात आहे. यामुळे शहरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हेस्कॉमच्यावतीने शहरात भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याचे काम करण्यात येत आहे. यामुळे शहरातील जलवाहिन्या मोडकळीस आल्या आहेत. पण याचा फटका नागरिकांना बसत आहे. विद्युत वाहिन्या, टेलिफोन केबल, ड्रेनेज वाहिन्या तसेच गॅस वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात येत आहे. यामुळे रस्त्यांची दुरवस्था होत आहे. जलवाहिन्यांना गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पण गळती निवारण करण्याकडे पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे.

बेळगाव-वेंगुर्ला मार्गाशेजारी विद्युत वाहिन्या घालण्याचे काम करण्यात आले आहे. गॅसवाहिन्या घालण्याचे कामही करण्यात आले. वाहिन्या घालताना जेसीबीने खोदाई करण्यात आली होती. त्यावेळी दोन ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली होती. परिणामी दररोज चार महिन्यांपासून पाणी वाया जात आहे. या ठिकाणी केबल व गॅस वाहिन्या घालताना गळती लागली होती. पण जलवाहिनीची दुरुस्ती न करताच केबल व गॅस वाहिन्या घालण्यात आल्याने गळतीद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. या ठिकाणी जलवाहिनीला दोन ठिकाणी गळती लागली आहे. याकडे पाणी पुरवठा मंडळासह कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष झाले आहे.

दूषित पाणी पुरवठा

बेळगाव-वेंगुर्ला रोडशेजारी असलेल्या फुटलेल्या जलवाहिनीमध्ये घाण पाणी मिसळत असल्याने परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. सदर पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. यामुळे जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.  

Related posts: