|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » leadingnews » एकटय़ा येडियुरप्पांनीच शपथ घेतली, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

एकटय़ा येडियुरप्पांनीच शपथ घेतली, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान 

ऑनलाईन टीम / बंगळुरू :

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचपर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9च्या सुमारास येडियुरप्पा यांनी कर्नाकटच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली आहे.

आज केवळ येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली. त्यांना आता येत्या 10 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे. जर बहुमत सिद्ध केलं, तर अन्य मंत्र्यांचा शपथविधी होईल.येडियुरप्पा तिसऱयांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी येडियुरप्पा ऑक्टोबर 2007 मध्ये केवळ 7 दिवसांसाठी मुख्यमंत्री होते. त्यावेळी जेडीएस आणि भाजपची युती होती. मात्र ती बिनसल्याने येडियुरप्पांना अवघ्या 7 दिवसात मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होते.यानंतर 2008 मध्ये येडियुरप्पांच्या नेतृत्त्वात कर्नाटकात भाजपची सत्ता आली त्यावेळी ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.