|Saturday, October 19, 2019
You are here: Home » leadingnews » उद्याच बहुमत सिद्ध करा : सुप्रिम कोर्टाचे येडियुरप्पांना आदेश

उद्याच बहुमत सिद्ध करा : सुप्रिम कोर्टाचे येडियुरप्पांना आदेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा ,असे आदेश सुप्रिम कोर्टाने येडियुरप्पांना दिले आहेत. त्यामुळे येडियुरप्पांना येत्या 28 तासात बहुमत सिद्ध व्रावे लागणार आहे. सुप्रिम कोर्टाच्या तीन सदस्यि खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

राज्यपालांकडून भाजपला सरकारस्थापनेचे आमंत्रण मिळताच बुधवारी रात्री काँग्रेस- जेडीएसने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे रजिस्ट्रार कार्यालय गाठून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. येड्डीयुरप्पा यांचा शपथविधी स्थगित करावा, या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी न्या. ए. के. सिक्री, शरद बोबडे व अशोक भुषण यांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले. त्यानंतर कोर्टात आज झालेल्या सुनावणीत भाजपाला उद्याच बहुमत सिद्ध करण्यास सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे. त्यामीळे येडियुरप्पा हे उद्या बहुमत सिद्ध करणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.