|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » माण-खटाव कारखाना वरदान ठरेल : मोरे

माण-खटाव कारखाना वरदान ठरेल : मोरे 

वार्ताहर/ मायणी

पडळ येथे उभा राहत असलेला खटाव-माण तालुका अँग्रो प्रोसेसिंग लि.हा साखर कारखाना या दुष्काळी तालुक्यातील ऊस उत्पादीत शेतकऱयासाठी वरदान ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे यांनी केले. निमसोड येथे आयोजित शेअर्स वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक उदयसिंह घाटगे, महेंद्र जगदाळे, दत्ता कोळी, जयभवानी पतसंस्थेचे चेअरमन सविता मोरे, व्हा. चेअरमन दादासो दगडे, सोनारसिद्ध सोसायटीचे चेअरमन दादासो कदम, व्हा. चेअरमेन चंद्रकांत सुतार, शिक्षक बँक संचालक चंद्रकांत मोरे, मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नंदकुमार मोरे म्हणाले, ज्यादा उसाच्या उत्पादनाने सध्या सुरू असलेले साखर कारखाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस नेण्यास असमर्थ ठरत आहेत. शेतकऱयांचा त्रास थांबवण्यासाठी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली या दुष्काळी पटय़ात साखर कारखाना उभा करण्याचे धाडस आम्ही केले आहे. त्यामुळे शेतकऱयांची आर्थिक पथही कशी उंचावली जाईल याकडेही आमचे लक्ष राहणार आहे.

उदयसिंह घाटगे म्हणाले, सध्या उभा राहत असलेला खटाव माण कारखाना फक्त साखर उत्पादनच नाही तर वीज निर्मितीसह अन्य घटकांची निर्मिती करणार आहे. याचा फायदा शेतकऱयांना होणार आहे.

  यावेळी  मुरलीधर मोरे, शामराव मोरे, श्रीरंग मोरे, जनार्दन  मोरे, अशोक मोरे, तानाजी घाडगे, तुकाराम घाडगे, विजय भादुले, धनाजी चव्हाण, रविंद्र  भादुले, समाधान मोरे, विष्णूपंत कदम, मनोज शितोळे, मोहन शितोळे, वसंत  घाडगे, दादा घाडगे, तानाजी मोरे, वसंत मोरे आदी या कार्यक्रमस उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार चंद्रकांत मोरे यांनी केले.

 

Related posts: