|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » मार्च तिमाहीचा जीडीपी दर 7.4 टक्के : इक्रा

मार्च तिमाहीचा जीडीपी दर 7.4 टक्के : इक्रा 

नवी दिल्ली

 2017-18 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा जीडीपी विकास दर 7.4 टक्क्यांवर पोहोचेल असे इक्रा या संस्थेने म्हटले. रब्बी उत्पादनात वाढ आणि कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाल्याने जीडीपीत वाढ होण्यास मदत होईल. डिसेंबर तिमाहीत जीडीपी विकास दर 7.2 टक्के होता.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून मार्च 2018 तिमाहीची जीडीपी आकडेवारी 31 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. औद्योगिक (मागील वर्षाच्या 6.8 वरून 7.7 टक्के), कृषी, मच्छीमारी (4.1 वरून 4.5 टक्के), सेवा (7.7 वरून 7.8 टक्के) या क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱया सहामाहीत आर्थिक घडामोडींमध्ये मजबूती दिसून आली. मात्र पेट्रोल, डिझेलचा वापर वाढल्याने सेवा आधारित निर्यात, देशांतर्गत हवाई प्रवासी सेवा, बंदरातून मालवाहतूक, रेल्वेचा मालवाहतुकीतून मिळणारे उत्पन्न या क्षेत्रात अपेक्षित वाढ होण्याचा अनुमान कमी आहे. निश्चलनीकरण, जीएसटी यामुळे पहिल्या सहामाहीत काही प्रमाणात फटका बसला होता.

Related posts: