|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » लक्ष्मीकांत खेडेकर यांचा गौरव सोहळा उत्साहात म्हार्दोळ येथे साजरा

लक्ष्मीकांत खेडेकर यांचा गौरव सोहळा उत्साहात म्हार्दोळ येथे साजरा 

वार्ताहर / म्हार्दोळ

 प्रियोळ येथील उद्योजक तथा वेलिंग प्रियोळ कुंकळय़े ग्रामपंचायतीचे पंचसदस्य लक्ष्मीकांत खेडेकर यांचा सुवर्णमहोत्सव वाढदिवस मोठय़ा उत्साहात व आनंदमय वातावरणात वेलिंग प्रियोळ कुंकळये ग्रामपंचायतीच्या सभागृहात साजरा करण्यात आला.

  वाढदिवसानिमित्त आयोजीत केलेल्या गौरव सोहळय़ाची सुरुवात दिपप्रज्वलीत करुन करण्यात आली.

  यावेळी उर्जा व समाजकल्याण मंत्री पांडुरंग मडकईकर, कला व सांस्कृतीक मंत्री गोविंद गावडे, भारतीय जनता पार्टी, गोवा प्रदेशचे अध्यक्ष विनय तेंडुलकर, वेलिंग प्रियोळ कुंकळय़े ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दामोदर नाईक, पंचसदस्य ऍड. वरद म्हार्दोळकर, मंगेश गावडे, संजना गावडे, रोहीणी नाईक, व्हिपीके अर्बन को-ऑप. सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक गावडे व्यासपिठावर उपस्थित होते.

  आई वडीलाचे चांगले संस्कार आणि आपल्या मनमिळावू स्वभावाने कित्येक मित्र परिवारांचे जाळे गुंतले आहे. कमी वेळेत उद्योगामध्ये नाव मिळविले. फळाची आशा नपाहता काम करा, फळ नक्किच मिळेल असा विश्वास व्यक्त केला. समाजसेवा करताना माणूसकी ठेवून काम करा, देव त्यांना कधीच विसरणार नाही. हितचिंतकाना व मित्रपरिवारांना सोबत घेवून काम केल्यास यश मिळेल असे मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना सांगितले. ही भेट राजकीय नसुन खेडेकर कुटुंबीयाबरोबर आपले कित्येक वर्षांपासून चांगले संबंध असल्यामुळे उपस्थित राहीलो असेही त्यांनी सांगितले.

   जिद्ध, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या जिवनात यश मिळविले आहे.  राजकारण फक्त दोन दिवसांचे आहे, पेम, आदर व प्रामाणिकपणा महत्वाचा आहे, आपल्या आईवडीलांचे आशिर्वाद आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचे असतात आणि लक्ष्मीकांत यांनी ते सिद्ध करुन दाखविले आहे, असे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. जनसेवेसाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या. विनय तेंडुलकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.

  माझ्या आई-बाबाचे चांगले मार्गदर्शन व आशिर्वाद तसेच पत्नीच्या सदोदीत सहकार्यामुळे आयुष्याची यशस्वी वाटचाल करीत आहे. आपल्या व्यवसायात देवाच्या आशिर्वादाबरोबर विनय तेंडुलकरांचेही सहकार्य लाभले आहे. माझे मित्र, हितचिंतक व वॉर्डमधील ग्रामस्थांनी मला सेवा करण्याची संधी दिली आहे. गावातील विकास कामे करण्यास मी सदैव प्रयत्नशील राहीन, असे लक्ष्मीकांत खेडेकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

  सुहासिनीहस्ते पन्नासदिप ओवाळण्यात आले. गौरव समितीतर्फे लक्ष्मीकांत खेडेकर यांना व मान्यवरांना समई देण्यात आल्या. मानपत्राचे वाचन साईच्छा गवंडी यांनी केले, पाहुण्याचे स्वागत व परिचर दामोदर फडते यांनी केला व आभार सुनिल गावडे यांनी मानले. मोठय़ा हितचिंतकांनी व मित्रमंडळीने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Related posts: