|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वाळू माफियांशी साटेलोटे; तीन पोलीस निलंबित

वाळू माफियांशी साटेलोटे; तीन पोलीस निलंबित 

प्रतिनिधी/ बेळगाव

वाळू माफियांशी साटेलोटे असल्याच्या आरोपावरून जिल्हा पोलीसप्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी गोकाक व रामदुर्ग येथील तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ माजली आहे.

गोकाक ग्रामीणचे मनोहर गोणी, लक्ष्मण देवर व रामदुर्ग पोलीस स्थानकातील सतीश या तिघा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वाळू माफियांशी साटेलोटे ठेवण्याबरोबरच व्यवहारात पैसे घेतल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकातील दोन व रामदुर्ग पोलीस स्थानकातील एक अशा एकूण तीन पोलिसांवर कारवाई करण्याची शिफारस पोलीस प्रमुखांकडे आली होती. यावरून पोलीसप्रमुखांनी हा निर्णय घेतला आहे. गोकाक व रामदुर्ग तालुक्मयात बेकायदा वाळू वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू असून या व्यवसायाला काही पोलिसांचे अभय असल्याच्या तक्रारी पोलीस प्रमुखांपर्यंत आल्या होत्या.