|Thursday, December 5, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » मेंदूवर शस्त्रक्रिया होत असताना रूग्णाचे गिटार वादन

मेंदूवर शस्त्रक्रिया होत असताना रूग्णाचे गिटार वादन 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

येथे एका 31 वषीय बांगलादेशी संगणक अभियंत्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया होत असताना तो गिटार वाजवत असल्याची अनोखी घटना घडली आहे. तस्कीन अली असे त्याचे नाव असून त्याला डायस्टोनिया हा मेंदू विकार आहे. यामुळे त्याचा डावा हात बधीर झाला आहे. बांगलादेशमध्ये या विकारावर शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध नसल्याने त्याने येथील भगवान महावीर जैन हॉस्पिटलमध्ये स्वतःला दाखल केले होते. गेल्या 17 मेला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तथापि, शस्त्रक्रिया करताना त्याचे पूर्ण शरीर अचेतन करण्यात आले नव्हते. केवळ मेंदूच्या विशिष्ट भागाला भूल देण्यात आली होती. त्यामुळे शस्त्रक्रिया सुरू असतानाही तो गिटार वादनाचा आनंद घेऊ शकत होता.

तस्कीन अली स्वतः उत्कृष्ट गिटार वादक असून त्याचे जाहीर कार्यक्रमही होतात. तो प्रतिदिन दहा तास किंवा त्याही पेक्षा जास्त काळ गिटार वादन करतो. तथापि, 2013 मध्ये त्याला प्रथम डायस्टोनिया या विकाराची लक्षणे दिसू लागली. शरीराच्या डाव्या बाजूला बधिरता जाणवू लागली. त्यामुळे त्याला डावा हात आणि बोटे हलविणे अशक्मय झाले होते. त्यामुळे काही काळ त्याचे गिटार वादन बंदही पडले होते. तो संगणक अभियंता असला तरी गिटार वादन हा त्याचा व्यवसाय आहे. त्यामुळे तो सुरळीत रहावा यासाठी त्याने शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय घेतला.

2017 मध्ये त्याला बेंगळूर येथे ही शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध असल्याची माहिती एका भारतीय वृत्तपत्रातून समजली. त्यानुसार त्याने बेंगळूरमधील भगवान महावीर जैन रूग्णालयाशी संपर्क साधला असता तयाला रूणालयात दाखल होण्यास सांगण्यात आले.

दोन तासांची शस्त्रक्रिया

17 मे या दिवशी त्याच्यावर दोन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. ती यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही काळ विश्रातीनंतर तो पुन्हा सतार वादनाचे कार्यक्रम करू शकेल, असा विश्वास त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर शरण व डॉ. संजीव सी. सी. यांनी व्यक्त केला आहे.

Related posts: