|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » क्रिडा » माजी फुटबॉलपटू टी. परेरा कालवश

माजी फुटबॉलपटू टी. परेरा कालवश 

वृत्तसंस्था / मुंबई

भारताचे माजी फुटबॉलपटू तसेच टाटा एफसी संघाचे प्रतिनिधीत्व करणारे  75 वर्षीय टिमोथी परेरा यांचे वयाच्या 75 व्या वर्षी येथे गुरूवारी रात्री उशिरा दीर्घकालीन आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिरंजीव आणि एक कन्या असा परिवार आहे. 

1967-68 च्या कालावधीत परेरा यांनी भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. तसेच ते गोवान्स स्पोर्टस आणि स्टेट बँक संघाकडूनही काही सामन्यात खेळ केला. त्यानंतर ते टाटा एफसीं संघाचे प्रतिनिधीत्व करीत होते. शुक्रवारी परेरा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी भारतीय फुटबॉल आणि हॉकी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी  त्यांना श्रद्धांजली वाहिली.