|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सुरेश पोटे यांचा षष्टय़ब्दीपूर्ती सोहळा

सुरेश पोटे यांचा षष्टय़ब्दीपूर्ती सोहळा 

बेळगाव :

मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 38 वर्षांची सेवा बजावून 31 मे रोजी निवृत्त झालेल्या सुरेश कृष्णाजी पोटे यांचा षष्टय़ब्दीपूर्ती आणि त्यांच्या विवाहाचा 37 वा वाढदिवस असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला.

वाढदिवसानिमित्त सुरेश पोटे यांनी माहेश्वरी अंधशाळा, शांताई वृद्धाश्रम, फिजिकली हँडीकॅप्ड असोसिएशन, सिद्धार्थ बोर्डिंग व प्रज्वल फौंडेशन आदी संस्थांना भेटून मिठाई वाटप केली.

सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात सुक्षेत्र यरनाळचे श्री श्री ब्रह्मानंद स्वामी यांच्या उपस्थितीत अनेक आप्तेष्टांनी शुभेच्छा दिल्या. ब्रह्मानंद स्वामींची पाद्यपूजाही करण्यात आली. त्यांनी पोटे दाम्पत्यास आशीर्वाद दिले.