|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » म्हाडाची मुंबईत एक हजार घरांची लॉटरी

म्हाडाची मुंबईत एक हजार घरांची लॉटरी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

जुलैच्या पहिल्या आठवडय़ात म्हाडा 1 हजार घरांची सोडत काढणार आहे. त्याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार असून जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच ऑगस्टचा शेवटच्या आठवडय़ात या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.

गोरेगाव, बोरिवली, विक्रोळी, मुलुंड, ऍण्टॉप हिल आणि मानखुर्द आदी ठिकाणी ही घरे उपलब्ध राहणार आहेत. यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी 800 आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी 200 घरे ठेवण्यात आली आहेत. या घरांची निश्चिती मुंबई मंडळाकडून पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया जूनच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण करून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई शहर आणि उपनगरातील एकूण 1 हजार स्वस्त घरांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

 

 

 

 

Related posts: