|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » विराट कोहली सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

विराट कोहली सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू 

वृत्तसंस्था /मुंबई :

गेल्या दोन वर्षात केलेल्या फलंदाजीतील जबरदस्त कामगिरीमुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची बीसीसीआयने गेल्या दोन मोसमातील सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू पुरस्कारासाठी निवड केली आहे. महिलांमध्ये विश्वचषक गाजवाणाऱया हरमनप्रीत कौर व स्मृती मानधना यांची याच पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे बीसीसीआयने गुरुवारी जाहीर केले.

‘गेल्या दोन मोसमातील शानदार प्रदर्शनामुळे टीम इंडियाचा कर्णधार कोहलीला प्रति÷sचा पॉली उम्रिगर पुरस्कार देण्यात येणार आहे. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार सोहळा 12 जून रोजी बेंगळूरमध्ये आयोजित केला जणार आहे,’ असे बीसीसीआयने सांगितले. 2016-17 या मोसमात कोहलीने 13 कसोटीत 74 च्या सरासरीने 1332 धावा जमविल्या तर 27 वनडेत 84.22 च्या सरासरीने 1516 धावा फटकावल्या. 2016-17 या मोसमात खेळलेल्या 6 कसोटीत त्याने 89.6 च्या सरासरीने 896 धावा जमविल्या व वनडेत 75.50 ची सरासरी त्याने राखली आहे. दोन्ही मोसमांचे मिळून त्याला 30 लाख रुपये देण्यात येतील.

महिलांमध्ये भारताला विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत मजल मारून देताना चमकदार प्रदर्शन केलेल्या हरमनप्रीत व स्मृती मानधना यांना प्रथमच सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात येत आहे. 2016-17 मोसमासाठी हरमनप्रीतला तर 2017-18 मोसमासाठी स्मृतीला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. माजी अध्यक्ष दिवंगत जगमोहन दालमिया यांच्या सन्मानार्थ चार पुरस्कारांचे नव्याने नामकरण करण्यात आले आहे. ‘यू-16 विजय मर्चंट करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱया व सर्वाधिक बळी मिळविणाऱया खेळाडूला तसेच महिलांमधील सर्वोत्तम कनि÷ व वरि÷ क्रिकेटपटूला दालमिया ट्रॉफी दिली जाणार आहे,’ असे बीसीसीआयने सांगितले. मंडळाने 9 गटातील पुरस्काराची रक्कम एक लाख रुपयांनी वाढविण्यात आली असून आता ती 1.5 रुपये करण्यात आली आहे. याशिवाय मंडळाने दिवंगत पंकज रॉय यांना 2016-17 सालाकरिता जीवनगौरव पुरस्कार देण्याचा निर्णयही घेतला आहे.

Related posts: