|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विशमता, शोषण याचा अंधार कमी व्हायला पाहिजे

विशमता, शोषण याचा अंधार कमी व्हायला पाहिजे 

प्रतिनिधी /पणजी :

आपल्या जीवनात असणारा आंधार कायमचा नष्ट झाला पाहिजे. आज काळ एराढा कठीण झाला आहे की जात, धर्म, विचार यांचा आपल्या मनात अंधार झाला आहे. हा एक अपेक्षाभंगाचा अंधार आहे. जागतिकिकरणाच्या दृष्टीने आपण वाटचाल करत आहोत आणि श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत आहे. या जागतिकिकरणाचा वाईट परीणाम म्हणजे श्रीमंत गरीब यांच्यातली दरी वाढली, पैशांचे मुल्य दिवसेंदिवस वाढत आहे तर माणसांचे मुल्य कमी होत आहे. समाजात तसेच जगात विशमता, शोषण याचा अंधार कमी व्हायला पाहिजे असे उद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी काढले.

गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा यांच्या विद्यमाने आयोजित ‘स्व. शशिकांत नार्वेकर व्याख्यानमाले’त ते प्रमुख वक्ते या न्यात्याने बोलत होते. यावेळी गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर आणि या व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ कोमरपंत उपस्थित होते. लक्ष्मीकांत देशमुख हे ‘पसायदान व तुमचे आमचे जगणे’ या विषयावर आपले विचार मांडत होते.

यावेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी पसायदान वाचून दाखविले व त्यातील प्रत्येक ओवीचा अर्थ सांगितला. ते म्हणाले की, माणसांमध्ये असणारे जे खलत्व आहे ते पहिल्यांदा पूर्णपणे नष्ट झाले पाहिजे. पसायदान हे आपल्या जगण्याचे मुल्य आहे. मानवतेचे महनमंगल स्तोत्र म्हणजे पसायदान आहे. जग कसे महान असावे हे देखील पसायदानात सांगितले आहे तसेच त्यासाठी समाज धारणेसाठी लागणारे शास्त्रही सांगितले आहे. पसायदानात धर्मातील विश्व प्रार्थना आहे आणि विश्वशांतीसाठी पसायदान हे महत्वाचे आहे.

Related posts: