|Monday, September 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » भन्नाट कुटुंबाची अतरंगी गोष्ट ‘इनक्रेडिबल्स 2’

भन्नाट कुटुंबाची अतरंगी गोष्ट ‘इनक्रेडिबल्स 2’ 

‘इनक्रेडिबल्स’ या गाजलेल्या ऍनिमेशनपटाचा सिक्वल ‘इनक्रेडिबल्स 2’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. इनक्रेडिबल्स अर्थात पार कुटुंब आणि फ्रॉन्झॉन उर्फ लुसियस बेस्ट यांच्यामध्ये सुरू असलेला लढा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. फ्रॉन्झॉन हा मेट्रोव्हिल बँक लुटण्याच्या तयारीत असतो. ही बँक लुटण्यापासून इनक्रेडिबल्स कशी रोखतात याची कथा या चित्रपटात पाहायला मिळते. ब्रॅड बर्ड यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हॉली हंटर, क्रेग नेल्सन, सराह वॉवेल, हक मिलनेर, सॅम्युअल जॅक्सन यांनी व्यक्तिरेखांना आवाज दिला आहे.