|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » आजपासून फुटबॉल विश्वचषकाचा थरार

आजपासून फुटबॉल विश्वचषकाचा थरार 

ऑनलाईन टीम / मॉस्को :

रशियात आयोजित एकज्वसाव्या फिफा विश्वचषकाला आजपासून सुरूवात होणार आहे.फुटबॉलचा हा विश्वचषक म्हणजे दर चार वर्षांनी येणारी फुटबॉलचा हा विश्वचषक म्हणजे दर चार वर्षांनी येणारी खेळांच्या दुनियेची जणू दिवाळी. मॉस्कोतल्या ल्युझिनिकी स्टेडियमवर एका दिमाखदार सोहळय़ात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात येईल. भारतीय वेळेनुसार रात्री साडेआठ वाजता यजमान रशिया आणि सौदी अरेबिया संघांमधल्या सामन्यानं विश्वचषकाची नांदी होईल.

 

फुटबॉल विश्वचषकाचा हा सण तब्बल 33 दिवस चालणार असून, या कालावधीत 32 संघ आणि 64 सामन्यांमध्ये मिळून सर्वोत्तम दर्जाचा फुटबॉल पाहायला मिळेल.व्लादिमिर पुतिनचा रशिया एकविसाव्या फिफा विश्वचषकाच्या आयोजनासाठी सज्ज झाला आहे. फुटबॉलचा हा विश्वचषक म्हणजे दर चार वर्षांनी साजरी होणारी अवघ्या जगाची दिवाळी.जगातला सर्वात ब्युटिफुल गेम अशी फुटबॉलची ख्याती आहेच, पण विश्वचषकाच्या निमित्तानं त्याच फुटबॉलच्या सौंदर्यात तब्बल 33 दिवस न्हाऊन निघण्याची तुम्हाआम्हाला संधी मिळणार आहे.

 

 

 

 

Related posts: