|Sunday, December 8, 2019
You are here: Home » Top News » मुंबईकरांच्या पाणीपट्टी दरात वाढ

मुंबईकरांच्या पाणीपट्टी दरात वाढ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईकरांच्या पाणीपट्टी दरात मुंबई महापालिकेकडून 3.72 टक्क्मयांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या घरगुती वापराच्या पाण्यासाठी प्रतिहजार लिटर मागे 4.91 रूपये जलआकार आहे. तो वाढून 5.09 रूपयांवर जाणार आहे.

दरवषी जास्तीत जास्त 8 टक्क्मयांपर्यंत जलआकार वाढवला जाऊ शकतो. यंदा 3.72 टक्क्मयांनी पाण्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ उद्या मध्यरात्री म्हणजे 16 जूनपासून लागू होईल.

 

पाणीपट्टीचे नवे दर (प्रतिहजार लिटरमागे)

  • बिगर व्यावसायिक संस्था- सध्या – 19.67 रूपये, वाढीनंतर – 20.40 रूपये,
  • व्यावसायिक संस्था- सध्या – 36.88 रूपये, वाढीनंतर – 38.25 रूपये
  • उद्योग, कारखाने- सध्या – 49.16 रूपये, वाढीनंतर – 50.99 रूपये
  • थ्री स्टारहून अधिक स्टार हॉटेल्स आणि रेसकोर्स- सध्या – 73.75 रूपये, वाढीनंतर – 76.49 रूपये
  • शीतपेय, बाटलीबंद पाणी- सध्या – 102.44 रूपये, वाढीनंतर -106.25 रूपये

Related posts: