|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » मुलाने आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष पाजले

मुलाने आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष पाजले 

ऑनलाईन टीम / लातूर :

मुलानेच आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष घातल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये घडला.यामध्ये 65 वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला तर आईची प्रकृती गंभीरआहे.

. साधुराम कोटंबे असे या मुलाच्या वडिलांचे नाव आहे तर गयाबाई असे आईचे नाव आहे. लातूर शहरातील मोरेनगर भागात ही घटना घडली.साधुराम कोटंबे आणि गयाबाई हे 13 जूनला मोरेनगर भागात असलेल्या घराच्या अंगणात रात्री 9 च्या सुमारास बसले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा ज्ञानदीप कोटंबे याने त्याच्या आई वडिलांना नारळ पाणी दिले. नारळ पाणी कडवट का लागते आहे? असे या दोघांनी मुलाला विचारले. मात्र नारळ पाणी कडवटच असते असे मुलाने आई वडिलांना सांगितले. साधुराम कोटंबे यांनी नारळ पाणी संपवले.

 

मात्र गयाबाई यांनी दोन घोट नारळपाणी पिऊन शहाळे तसेच ठेवून दिले. काही वेळाने साधुराम कोटंबे आणि गयाबाई या दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले. या दोघांनाही लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान साधुराम कोटंबे यांचा 14 जूनच्या रात्री मृत्यू झाला.