|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘झिपऱया’ला तौफिक कुरेशी यांचे पार्श्वसंगीत

‘झिपऱया’ला तौफिक कुरेशी यांचे पार्श्वसंगीत 

   पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारित झिपऱया चित्रपट येत आहे. ए. आर. डी. प्रॉडक्शन्स आणि दिवास् प्रॉडक्शन्स निर्मित तसेच सहनिर्माता अथर्व पवार क्रिएशन्स तसेच अश्विनी  दरेकर प्रस्तुत झिपऱया या बहुचर्चित, प्रेरणादायी चित्रपटाचा म्युझिक, ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत मोठय़ा उत्साहात पार पडला.

   मुंबईसह अनेक मोठय़ा रेल्वेस्टेशनवर आपण अनेकदा बूट पॉलिश करणारी किशोरवयीन मुले बघितली असतील. ‘झिपऱया’ चित्रपट अशाच मुलांच्या भोवती फिरणारा आहे. यामध्ये रेल्वे स्टेशनवर बूट पॉलीश करणाऱया एका तरुणाचा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास मांडण्यात आलेला आहे. सभोवतालची परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी सुद्धा भविष्याबाबत तो निराश नाही. दरम्यान, या जगण्याच्या संघर्षात झिपऱयाला पोलिसांची भीती का वाटू लागते? झिपऱया आपल्या बहिणीच्या लग्नाच्या टेन्शनमध्ये नेमके काय काय करतो? असे अनेक प्रश्न या चित्रपटात पडतात, या कथेत असलेले एक गूढ आणि त्या भोवती घेरलेले झिपऱयाचे आयुष्य आहे. तर दुसऱया बाजूला दारिद्रय़ हालअपेष्टा यांच्यावर मात करून स्वत:सह मित्रांच्या आयुष्यात सोनेरी रंग भरण्यासाठी तो धडपड करत आहे.

  अश्विनी दरेकर प्रस्तुत ‘झिपऱया’ची निर्मिती रणजित दरेकर यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन केदार वैद्य यांचे आहे. यामध्ये चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमफता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज आहे. ‘झिपऱया’चे एक खास वैशिष्टय़े म्हणजे या चित्रपटाचे पार्श्वसंगीत ज्येष्ठ पर्कशनिस्ट तौफिक कुरेशी यांनी दिले आहे. या चित्रपटाला समीर सप्तीसकर, ट्रॉय-अरिफ यांनी संगीत दिले असून अभिषेक खणकर, समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत. कला दिग्दर्शक विनायक काटकर, नफत्यदिग्दर्शक उमेश जाधव तर डीओपी राजेश नादोने आहेत. तीन राज्य पुरस्कारांची मोहोर उमटलेला ‘झिपऱया’ येत्या 22 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Related posts: