|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उत्तर कोरियाचा हुकुमशहा पुन्हा चीनच्या दौऱयावर

उत्तर कोरियाचा हुकुमशहा पुन्हा चीनच्या दौऱयावर 

ट्रम्पसोबत झालेल्या चर्चेचा तपशील मांडणार

वृत्तसंस्था/ बीजिंग

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग-उन मंगळवारी पुन्हा एकदा बीजिंगमध्ये दाखल झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सिंगापूरमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील किम चीनच्या अध्यक्षांना सादर करणार आहेत.

बीजिंग विमानतळावर मंगळवारी सकाळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सैनिकांनी पत्रकारांना छायाचित्रणास मज्जाव केला असल्याने किम यांची छायाचित्रे समोर आली नाहीत. विमानतळावरून कारने किम जोंग-उन हे जिनपिंग यांच्या निवासस्थानी पोहोचले.

मार्च महिन्यात किम जोंग-उन यांनी चीनचा पहिला दौरा केला होता. सत्ता सांभाळल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता. परंतु मंगळवारी ते तिसऱयांदा चीनमध्ये दाखल झाले आहेत. मे महिन्याच्या प्रारंभी ते चीनच्या दौऱयावर गेले होते. उन 20 जूनपर्यंत चीनच्या दौऱयावर असतील, अशी माहिती शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली.

चीनने सिंगापूरच्या बैठकीत प्रतिनिधित्व केले नसले तरीही या परिषदेत त्याची महत्त्वाची भूमिका होती असे मानले जाते. सिंगापूर परिषदेनंतर ट्रम्प आणि किम यांनी उत्तर कोरियाने आण्विक निशस्त्राrकरणासाठी तयारी दर्शल्याची घोषणा केली होती.

उत्तर कोरियाला याबदल्यात अमेरिकेने सुरक्षेच्या हमीचे आश्वासन दिले आहे.