|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी दोघांना सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी दोघांना सक्तमजुरी 

प्रतिनिधी/ सांगली

अल्पवयीन मुलीस पळवून नेवून तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याबद्दल सोलापूर जिल्हय़ातील दोघांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार दंडाची शिक्षा झाली. रामचंद्र संताजी कसबे (वय 20 रा. खरसोळी ता. पंढरपूर) आणि दादासाहेब आनंदा ओव्हाळ (वय 20) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस. व्ही दीक्षित यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावली.

 याबाबत माहिती अशी, यातील रामचंद्र कसबे हा एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला एकतर्फी प्रेमातून वारंवार त्रास देत होता. पीडित मुलगी ही आजोबांबरोबर मिरज-पंढरपूर रेल्वेतून पंढरपूर येथे जात असताना त्याने तिचा पाठलाग करून लगट करण्याचा प्रयत्न केला. पण, तिने दाद न दिल्याने त्याने दिला जबरदस्तीने मोबाईल देण्याचा प्रयत्न केला. तिने मोबाईल घेतला नाही. त्यामुळे त्याने तिच्या बॅगेत मोबाईल टाकला. तो वारंवार तिला पळून जावून लग्न करूया असे म्हणत होता. तरीही तिने त्याला दाद दिली नाही.

 मिरज तालुक्यातील अंकली येथे आजोळी आली असता कसबे आणि त्याचा साथीदार दादासाहेब होव्हाळ यांनी तिला जबरदस्तीने गाडीवर बसवून पळवून नेले. तिच्याशी अश्लिल वर्तन केले. त्यामुळे पीडित मुलीच्या नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. न्या. सौ. दीक्षित यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. कसबे याला ओव्हाळने साथ दिल्याने दोघांचाही गुन्हा समान गृहीत धरून न्यायालयाने दोघांनाही तीन वर्षाची सक्तमजुरी आणि एक हजार दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षाकडून नऊ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, पंच, तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

 

Related posts: