|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर 16 जुलैला निर्णय

कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर 16 जुलैला निर्णय 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आपल्यावरील आरोपमुक्त करण्यासाठी हायकोर्टात केलेल्या याचिकेवर निर्णय 16 जुलैपर्यंत राखून ठेवला आहे. 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत कर्नल प्रसाद पुरोहित.

कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आपल्यावर आरोप ठेवण्यापूर्वी लष्कराची परवानगी घेण्यात आली नसल्याने आपल्याविरोधात खटलाच दाखल करता येणार नाही, असे म्हणत आरोपमुक्त करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. पुरोहित यांच्या या याचिकेला एनआयएने मात्र विरोध केला आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने पुरोहित यांना एनआयए कोर्टात जाण्याचे निर्देश दिले असल्याने, हायकोर्टात त्यांनी असा अर्ज करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

यावरच आज न्यायमूर्ती आर. एम. मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठापुढे पुन्हा सुनावणी होणार आहे. कर्नल पुरोहित यांच्यावरील मोक्का अंतर्गत असलेले आरोप हटवण्यात आले असून, त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत मात्र आरोप कायम ठेवण्यात आलेले आहेत. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित 2008 च्या मालेगाव स्फोटानंतर देशभरातले सर्वात चर्चेत असलेले नाव आहे. एटीएसने पुरोहितांना अटक केल्यानंतर तब्बल 9 वर्ष त्यांनी जेलमध्ये घालवली आणि अखेर सुप्रीम कोर्टाकडून त्यांना 21 ऑगस्ट 2017 रोजी जामीन मंजूर करण्यात आला. केंद्रीय गृहखात्याने 2011 च्या सुरूवातीला तपास एनआयएकडे सोपवला. 4 हजार पानी आरोपपत्र दाखल झाले. पण 9 वर्षात एकाही आरोपाची निश्चिती झाली नाही. याआधी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांचा जामीन हायकोर्टानेही फेटाळला होता. त्याला पुरोहितांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. एनआयएला 9 वर्ष केस तडीस लावण्यात यश आले नाही. शिवाय आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, याशिवाय मोठा युक्तीवादही करणे शक्मय झाले नाही. याउलट पुरोहितांची बाजू देशातले नामांकित वकील हरीश साळवेंनी मांडली. आरोपपत्रात एनआयएने विसंतगत आणि परस्परविरोधी माहिती दिल्याचे साळवेंनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. 2008 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता तर 80 जण जखमी झाले होते. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावत एका बाईकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर स्फोटासाठी आरडीएक्स पुरवणे आणि कट रटल्याच्या आरोपाखाली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.